Viral Video: भारतात विविध प्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात त्यातलाच एक सण म्हणजे होळी. आज २४ मार्च रोजी होळी तर उद्या २५ मार्चला रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. एखादा सण असेल की, कन्टेन्ट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, फूड ब्लॉगर, कलाकार त्यांचे कौशल्य दाखवत काही तरी खास करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, होळीनिमित्त एका तरुणीला रील बनवणं चांगलचं महागात पडलं आहे.

व्हायरल व्हिडीओत तरुणी होळीनिमित्त स्टंट करताना दिसते आहे. नारंगी रंगची साडी नेसून पायात स्पोर्ट्स शूज घालून ती एक अनोखा स्टंट करण्यासाठी तयार आहे. तसेच तरुणीच्या बुटाला सेलोटेपने कलर पॉप (colour popper) चिटकवून घेतला आहे. तसेच तरुणीबरोबर असणारा तिचा एका मित्र या कलर पॉपला आग लावतो आणि मग तरुणी पोलवर हात ठेवून गोल गोल फेऱ्या घेताना दिसते आहे. गोल फिरताच या कलर पॉप मधून रंगीबेरंगी रंग सर्वत्र पसरताना दिसतात. मात्र पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही थक्क व्हाल.तरुणीचा स्टंट एकदा तुम्हीसुद्धा पाहा.

हेही वाचा…रेल्वेत सामान ठेवण्यावरून दोन प्रवाशांमध्ये जोरदार वाद ; भांडणाचा VIDEO चर्चेत, रेल्वेने दिली प्रतिक्रिया…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, स्टंट शूट करून झाल्यावर तरुणी खाली उतरते. तेव्हा तिच्या बुटांजवळ जोडण्यात आलेला ‘कलर पॉपला’ लावलेली आग विझवण्याऐवजी तिच्या साडीचा फॉल पेट घेतो. तसेच ही तरुणी उद्या मारून आग विझविण्याचा प्रयत्न करते. मात्र आग विझत नसल्याने तरुणी बरोबर असणारे मित्र-मैत्रिणी धावून येतात आणि आग विझविण्याचा प्रयत्न करू लागतात.

एकंदरीतच तरुणीच्या मनाप्रमाणे या स्टंटचा शेवट झाला नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shalugymnast या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. अनेक जण ‘हा फक्त मूर्खपणा आहे’, ‘आग लागल्यावर काही क्षणात स्टंटबाजी नाहीशी झाली’ ; आदी अनेक कमेंट नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.