Viral video: आई होणे हा अनुभव प्रत्येक स्त्रीसाठी अभुतपूर्व असतो. त्यासोबत घरातील प्रत्येकासाठी हा आनंदचा क्षण असतो. मात्र हा अनुभव हे मातृत्व प्रत्येक स्त्रीच्या नशिबात असेलच असं नाही. आपल्या आजूबाजूला अनेक स्त्रीया असतात त्यांचं हे स्वप्न स्वप्नच राहतं. बरं, विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे तरी सगळ्यांना बाळ हे नैसर्गिकरित्या जन्माला यावे अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. असंच एका जोडप्यासोबत झालं. लग्नानंतर तब्बल १५ वर्ष वाट बघितल्यानंतर अखेर ती आई होण्याची गुडन्यूज तिच्या नवऱ्याला देते तेव्हा नवऱ्याचं काय होतं हे तुम्हीच पाहा. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

अटलांटा, जॉर्जिया येथील ३७ वर्षीय ब्री ओवेन्स ही महिला गेल्या १५ वर्षांपासून आई बनण्याचा प्रयत्न करत होती. त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत असताना तिने आणि तिचा पती स्टीफन यांनी मुले दत्तक घेण्याचा विचार केला. या जोडप्याने १०१५ ते २०२३ पर्यंत चार मुले दत्तक घेतली. मात्र तरीही या जोडप्याला स्वतःचे मूल व्हावे अशी खूप इच्छा होती. पण १५ वर्षांत एकदाही असे घडले नाही. तरीही या जोडप्याने आशा सोडली नाही. शेवटी, १५ वर्षांनंतर देवाने तिचे ऐकले आणि ती पहिल्यांदा गरोदर राहिली. महिलेनं जेव्हा तिच्या पतीला हे सांगितले तेव्हा त्याला काही वेळा वाटले की कदाचित ती विनोद करत आहे. त्याला काहीच उमगत नाही. मात्र त्याचे डोळे बोलत असतात. त्याला झालेला आनंद हा नक्कीच पाहाण्यासारखा आहे. यावेळी त्याने व्यक्त केलेल्या भावना शब्दांच्या पलिकडच्या आहेत.

तिला मातृत्व मिळालं अन् त्याचा बांध फुटला

व्हिडिओमध्ये महिला तिच्या पतीला ‘मी गरोदर राहिले तर काय होईल?’ असा प्रश्न विचारते तेव्हा तिचा नवरा उत्तर देतो असं झालं तर मी आंनदाने वेडा होईन. त्यानंतर महिला खरोखर त्याला तू बाबा होणार आहे असं सांगत आनंदाची बातमी देते आणि टेस्ट पॉसिटिव्ह आल्याचं सांगते. हे एकून तिचा नवरा आनंदाने नाचू लागतो आणि मिठी मारतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> एटीएममधून अधिक धनलाभ! काढायला गेले ५००० रुपये निघाले १०,०००; पैसे काढण्यासाठी तोबा गर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक कौतुकाच्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @brie_owens या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.