Viral Video: खेड्यातील अनेक महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतं. यापलीकडे जाऊन त्यांना स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी फार कमी मिळतो. पण, त्यातूनही हल्ली सोशल मीडियामुळे अनेक हौशी महिला आपल्यातील कला न घाबरता सादर करू लागल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.
सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या घरामध्ये ‘काटा लगा हाय लगा’, या हिंदी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल. ग्रामीण भागातील हा महिलेचा डान्स एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असा आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shitalchandankhede1234 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला बोलतात गावाकडचं टॅलेन्ट.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “यांच्यापुढे बॉलीवूड अभिनेत्री फिकी.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “फेमस होण्यासाठी अंगप्रदर्शन करायची गरज नाही हे दाखवून दिलं शेतकऱ्यांची कारभारीन” आणखी एकाने लिहिलेय,, “तुमच्यासमोर एखादी हीरोईन पण मागे पडेल भारी डान्स करत आहात वहिनीसाहेब”