Rapido Driver Viral Video : सर्वानाच सुंदर दिसायला आवडते. निसर्गाने जन्माला येताना आपल्याला जे रूप दिले आहे ते सुंदरच आहे. पण, काही जण अगदी परफेक्ट दिसण्यासाठी मेकअप, केस सरळ करून घेणे या गोष्टी करून इतरांपेक्षा आणखीन सुंदर दिसण्याच्या प्रयत्न करतात आणि दुसऱ्यांचीही बॉडी शेमिंग करतात. एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराची ठेवण, रंग, रूप, उंची, वजन यासारख्या गोष्टींवरून हिणवणे याच गोष्टीला बॉडी शेमिंग करणे असे म्हणतात. तर आज याचसंबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका रॅपिडो बाईक चालकाच्या दिसण्यावरून थट्टा केल्यान एका महिलेला तीव्र प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले.
करसिमरन कौर मट्टू या युजरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केला जातो आहे. महिलेने रॅपिडो बुक केली आणि त्यानंतर रॅपिडो ड्रायव्हर तिच्या बिल्डिंगखाली येऊन उभा राहिला. रॅपिडो ड्रायव्हरचे वजन जास्त असल्यामुळे तिने त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून त्याची थट्टा करण्यास सुरुवात केली. रॅपिडो ड्रायव्हरचे पोट जास्त दिसत असल्यामुळे आणि त्याने मागे लावलेल्या बॅगमुळे महिलेला बाईकवर बसायला जागा नसते. त्यामुळे ती राईड रद्द करणार असते.
पण बदनामी करण्याची काय गरज? (Viral Video)
पण, त्याआधी महिला संतापजनक कृत्य करते. महिला सगळ्यात आधी रॅपिड ड्रायव्हरचा गुपचूप व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरुवात करते आणि युजर हसत म्हणते की, “मी रॅपिडो बाईक राईड बुक केली आहे. मी हा व्हिडीओ घरातून लपून बनवत आहे जेणेकरून तो नाराज होऊ नये. पण, रॅपिड ड्रायव्हरकडे तुम्ही बघा आणि बाईकवर मी कुठे बसू हे तुम्हीच मला सांगा” ; असे ती व्हिडीओत म्हणताना दिसते आहे. एवढेच नाही तर ही थट्टा करून झाल्यावर ती हा व्हिडीओ तिच्या अकाउंटवरून पोस्ट करते.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @popinions.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मात्र नेटकरी हा व्हिडीओ [याहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. “मला रॅपिडोवर बुक केलेली राईड रद्द करावी लागली” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. “मग बसू नकोस. तुला बसायला कोण सांगत आहे? हो, खरं आहे की, मागे जागा नाहीये पण कोणाची बदनामी करण्याची काय गरज आहे?तो जाडा असल्यामुळे बाईकवर बसायला जागा नाही दिसत आहे तर राईड रद्द कर ना. सोशल मीडियावर टाकण्याची काय गरज आहे”, ” ती बरोबर बोलते आहे यार बाईकवर बसायला खरंच जागा नाही आहे”, “रॅपिडोने त्याला मोठी बाईक द्यायला पाहिजे होती” ; आदी वेगवेगळ्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.