Viral Video: समाजमाध्यम वापरकर्त्यांसाठी रस्त्यावर डान्स करणाऱ्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ पाहणं नवीन गोष्ट नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. कधी मोठमोठ्या शहरांतील रस्त्यांवर तर कधी लोकल आणि मेट्रोमध्ये रील्स बनवणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ पाहण्यासारखे असतात, तर काही व्हिडीओ पाहून अक्षरशः डोक्यात तिडीक जाते. दरम्यान, आताही एक आगळावेगळा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील महिला रीलसाठी डान्स करत असून तिचा पती व्हिडीओ शूट करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर पटकन व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. डान्सची आवड असणारे लोक व्हिडीओ बनवण्याआधी कपडे, मेकअपपासून ते डान्स करण्याची जागा निवडण्यापर्यंत सर्व गोष्टी ठरवतात. या व्हिडीओत महिलेने चक्क डान्ससाठी हायवेची निवड केलेली पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला हायवेवर बेभान होऊन डान्स करत असून यावेळी तिचा पती तिच्या डान्सचे शूटिंग करताना दिसत आहे. या पती-पत्नीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ X वरील @ChapraZila या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहिलंय की, “काय मूर्ख लोक आहेत”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “निव्वळ मूर्खपणा”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “पुरुषप्रधान समाज हरवत चाललाय.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.