Viral Video: सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका तरुणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

हल्ली कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. हल्ली कधी ‘एक नंबर तुझी कंबर’, हे गाणं तर कधी ‘उठ रे उठ रे हनुमान तुला मानस’ हे गाणं खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला‘उठ रे उठ रे हनुमान तुला मानस’ या सध्या चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @prajakta_sakate1508 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, खूप छान नाचलीस ताई तू” तर दुसऱ्याने लिहिलेय, “अतिशय सुंदर खूप छान आहे ”, तर तिसऱ्याने लिहिलेय, “अस्सल डान्स केला”.