Ashi Chick Motyanchi Mal Dance Video Viral : महाराष्ट्रात अनेक सणउत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. पण, गणेश चतुर्थी हा सण सगळ्यांच्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. त्यामुळे यादरम्यान मोदक बनवण्याच्या टिप्स, मखर खरेदी करण्याची दुकाने, बाप्पाच्या मुर्त्या आदी अनेक रिल्स आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत; यामध्ये ‘अशी चिक मोत्यांची माळ’ या गाण्याला थोडा ट्विस्ट देऊन स्टायलिश स्टेप्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण, आज या गाण्यावर सोशल मीडियावर प्रसिद्ध महिलांच्या ग्रुपने डान्स केला आहे.
चाळीतल्या या पाच महिला वेळात वेळ काढून छान तयार होतात. एखादे मराठी गाणे निवडून, त्यावर डान्सच्या अगदी सोप्या स्टेप्स बसवून त्यांची डान्स करण्याची आवड पूर्ण करतात. तर आज त्यांनी चक्क ट्रेंडिंग गाण्यावर ‘अशी चिक मोत्यांची माळ’ या गाण्यावर खूप सुंदर डान्स केला आहे. गाण्यातील प्रत्येक ओळीवर त्यांचे हावभाव, त्यांच्या स्टेप्स तर अगदी बघण्यासारख्या आहेत. तसेच कोणतीही फॅन्सी जागा न शोधता, व्हिडीओ एडिट न करता अगदी नैसर्गिकपद्धतीने त्या व्हिडीओ शूट करतात म्हणून त्यांच्या ग्रुप नेटकऱ्यांच्या पसंतीतही पडतो.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, चाळीतल्या महिलांनी ‘अशी चिक मोत्यांची माळ’ या गाण्यावर केलेला डान्स इतका सुंदर आहे की, महिलांच्या स्टेप्स आणि हावभावावरून तुमची नजर हटणार नाही. महिलांचे साडीतले सौंदर्य पाहून अनेक जण त्यांचे कौतुक करत आहेत. महिलांच्या ग्रुपचा डान्स व्हिडीओ व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
“या गाण्यावर ट्रेंड चालू होता. पण तुम्ही मस्तचं केलं” (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mansi.gawande.73 आणि @shreeja_the_traditional_affair या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून महिलांचे कौतुक करताना दिसत आहेत. “बहारदार नृत्य सादरीकरण”, “सुंदर”, “मस्त काकू”, “या गाण्यावर ट्रेंड चालू आहे. पण तुम्ही मस्तचं केलं”, “वाह्ह वाह्ह खूपच सुंदर”, “ट्रेंडच्या विजेत्या तुम्हीच” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.