Viral Video Today: दिवाळी आता दोन दिवसांवर आली आहे, आतापर्यंत तुमच्याही घरात साफसफाई होऊन फराळाची सुरुवात झाली असेल, हो ना? किंवा जर तुम्ही आता दिवाळीपूर्वीचा शेवटचा शनिवार रविवार साधून स्वच्छता करणार असाल तरीही हरकत नाही. उलट तुम्हाला थोडं प्रोत्साहन मिळावं असा एक व्हिडीओ आज आपण पाहणार आहोत. मंडळी व्हिडीओ पाहण्याच्याआधीच एक लक्षात घ्या हा प्रकार तुम्ही चुकूनही प्रत्यक्ष करायला जाऊ नका. पण या व्हिडिओमधील मॅडमचा उत्साह पाहून तुम्हाला नक्कीच घर स्वच्छ करायची ऊर्जा मिळेल. तर झालं असं की अलीकडेच एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता ज्यात एक बाई अक्षरशः चौथ्या माळ्यावर स्पायडरमॅन सारखी लटकून स्वच्छता करताना दिसत आहे.
अनेकदा आपणही समस्या अनुभवली असेल, आपण घराच्या खिडक्या आतल्या बाजूने तर स्वच्छ करतो पण बाहेरच्या बाजूने त्या स्वच्छ करता येत नाहीत. विशेषतः जर तुम्ही बिल्डिंगमध्ये थोडं वरच्या माळ्यावर राहत असाल तर खिडकी स्वच्छ करण्यासाठी खिडकीच्या बाहेर जाणे शक्यच होत नाही. पण या समस्या या व्हिडिओमधील महिलेला थांबवू शकली नाही. तिने बिल्डिंगच्या चौथ्या माळ्यावरून खिडकीच्या बाहेर लटकून खिडकीची काच स्वच्छ करण्याचा पराक्रम केला आहे. मुख्य म्हणजे यावेळी खिडकीला ग्रीलिंग सुद्धा लावलेले नव्हते.
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ इंदिरापुरममधील रहिवासी श्रुती ठाकूरने शूट केला असून स्टंट करणाऱ्या महिलेचे नाव शाहिदल असे आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अतिशय मजेशीर कमेंट केल्या आहेत. आता जर या महिलेच्या घरी लक्ष्मी माता नाही आली तर ती कोणाकडेच येणार नाही. असे कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.
पाहा व्हायरल व्हिडिओ
दरम्यान, शेअर केल्यापासून, व्हिडिओला १.३ मिलियनहुन अधिक व्ह्यूज आणि ४८०० हून अधिक रिट्विट्स आहेत. अनेक युजर्सनी कमेंट करत ,”लक्ष्मीचं माहित नाही पण मला छतावर यमराज दिसत आहेत.” असे म्हणत महिलेच्या अतिउत्साहावर मजेशीर टीका केली आहे. तर काहींनी देव करो आणि हि बाई सुरक्षित असो असेही म्हंटले आहे. तुम्ही असे काहीच प्रयोग करून पाहू नका. दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा!