Viral Video Shows Joint Family Bonding : मुंबई एक असे शहर जिथे तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतात. पण जागेची कमतरता, छोटी घर या सर्व माणसांच्या नशिबी असतात. त्यामुळे सध्या संयुक्त कुटुंबामध्ये राहण्याऐवजी लोक लहान कुटुंबात राहणे जास्त पसंत करतात. त्यानंतर मग छोट्या छोट्या कार्यक्रमांना ही सगळी मंडळी एकत्र येतात आणि सगळ्यांनाच या दरम्यान “मोठ्या कुटुंब” असले की, कशी मजा-मस्ती असते; हे अनुभवायला मिळते. आज सोशल मीडियावर मोठं कुटुंब म्हणजे नक्की काय असते हे पाहायला मिळाले आहे.

एखाद्या कार्यक्रमानिमित्त @_kshetal इन्स्टाग्राम युजरचे कुटुंब एकत्र जमले आहे. आजी-आजोबा, आई-बाबा, काका-मावशी, काका-काकी, आत्या-मामा, भाऊ-बहिणी, दादा-ताई कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर, मोठा वर्तुळ करून खुर्च्यांवर बसले होते . या सगळ्यांना, त्यांच्या सुखाला नजर नको लागू दे म्हणून कुटुंबातील काकू सगळ्यांची नजर काढताना दिसत आहे. हे पाहून अनेक जणांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरंगतात. घरातील एक तरुण मुलगी सगळ्यात शेवटी नजर काढणाऱ्या काकूंची सुद्धा नजर काढते आणि व्हिडीओचा असा गोड शेवट होतो.

नातीगोती असावीत नेहमी आंबट गोड चवीची, रंगत वाढवतात ते आपल्या आयुष्याची… (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @_kshetal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या खास क्षणाचा व्हिडीओ पोस्ट करत युजरने कॅप्शन लिहिली आहे की, “नातीगोती असावीत नेहमी आंबट गोड चवीची, रंगत वाढवतात ते सदाच आपल्या आयुष्याची. हाक मारली की धावून येतात पटकन, नड भासली कशाची, की भागवतात चटकन. कार्याची शोभा का उगाचच बरं वाढते, त्यांच्या मूळच तर, ते खुलून दिसते. हास्याचे कारंजे उडतात घरी वरचेवर, तोडगा लगेचच मिळतो,. घरगुती कुरबुरीवर, राग मनात न ठेवता, प्रवाहतीत व्हावं” ; अशी सुंदर कॅप्शन लिहिली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून प्रेमात पडले आहेत आणि “परिवार जोडून ठेवणे एवढ सोपं नसतं लय मोठ्या मनाच माणूस लागते ह्या माऊलीची नजर पहिली काढा”, “सलाम त्या माऊलीला जिने हे कुटुंब अजून पर्यंत एकत्र ठेवलं”, “प्रॉपर्टीचे वाद नसतील घरात तुमचा आणि मुली दिल्या घरी सुखी असतील. म्हणून हे चित्र”, “त्या माऊली ने आयुष्यभर नाती जपून कमवलेलं पुण्य आहे हे”, “कोणालाही तुमचा हेवा वाटावा असा कुटुंब आहे खूप छान आहे”, “सगळे सुखच ह्यातच तर आहे”, ” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.