Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ, फोटो रोज व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसविणारे, तर काही थक्क करणारे असतात. कधी मजेशीर, विचित्र, धोकादायक, स्टंटचे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या विश्वात कुठे काय घडेल आणि कधी व्हायरल होईल ते काही सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो एका ऑफिसमधील आहे.

ऑफिस म्हटलं की, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख, तणाव पाहायला मिळतो. परंतु दिवाळी, ओणम, ख्रिसमस अशा सणांच्या काळात अनेक ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सेलिब्रेशन ठेवले जाते. ज्यात कर्मचारी आपली कला देखील सादर करताना दिसतात. विविध खेळ खेळतात, गाणी म्हणतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका ऑफिसमधील ओणम सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक तरूणी सुंदर डान्स करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका ऑफिसमध्ये तरूणी “उई अम्मा” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा जबरदस्त डान्स पाहून आसपास बसलेले तिचे सहकारी टाळ्या वाजवून तिला प्रोत्साहन देताना दिसत आहे. तिचा हा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:


हा व्हिडीओ @legendaryiasmentor इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज अन् लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओ कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, की, “काय खतरनाक नाचली ही” तर एका युजरने लिहिलेय, “मस्त केला डान्स” आणखी एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर नाचली ही”