Viral video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. मात्र तरीही तरुणाई यातून काहीही बोध घेत नाही. असाच एका तरुणाता धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो चक्क ट्रकच्या टायरच्यामध्ये उभा राहून स्टंटबाजी करत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणाचा स्टंट करताना व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये तरुण ट्रकच्या दोन्ही टायरच्यामध्ये उभा राहिला आहे. हा व्हिडीओ खूपच थरारक आहे. यावेळी कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याने ट्रक चालला आहे. या चालू ट्रकच्या दोन्ही टायरच्यामध्ये तरुण उभा आहे. त्यानं पायात स्केटिंग बोर्ड आहे. या दरम्यान रस्त्यावर एखादा स्पीडब्रेकर आला, खड्डा आला तर तरुणाचा किती भयानक अपघात होऊ शकतो याची कल्पना न केलेलीच बरी.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – दोन मिनिटांपूर्वी मारत होत्या गप्पा; अचानक उपटू लागल्या एकमेकींच्या झिंज्या, दोन बायकांचा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर फेमस किंवा व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. अशात अनेक महानग प्रसिध्दीसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकतात. यातील काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात. तर काहींना जन्माची अद्दल घडते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@meme_pharma02 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वारंवार अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र तरीही तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही.