जर तुम्हाला काल्पनिक कथा आवडत असतील आणि तुमच्या लहानपणी रात्री झोपताना अंथरूणात पडून आजींकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या असतील, तर तुम्हाला हा व्हिडीओ पाहायला आवडेल. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची मोहिनी कायम आहे. आतापर्यंत तुम्ही गोष्टींमध्ये ऐकलेला अलाद्दिन प्रत्यक्ष पहायला मिळतोय, हे वाचून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. दुबईमध्ये सध्या अलाद्दिन अवतरला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

तुमच्या रोजच्या गजबजणाऱ्या गल्लीत, ट्रॅफिकमधून फिरताना आणि तुमच्या दारातून जाताना, तुम्हाला नमस्कार म्हणताना, तुम्हाला अलाद्दिन भेटणं किंवा त्याला प्रत्यक्ष पाहणं हे तुमच्यासाठी नक्कीच रोमांचकारक असेल. ‘चाळीस चोर’ कुठे लपले आहेत याची खात्री नसली तरी दुबईच्या लँडस्केपमध्ये तुम्ही हा देखणा अलाद्दिन पाहू शकता.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?

तुम्हाला यावर विश्वास ठेवणं अवघड होईल. परंतु दुबईच्या जमिनीवर आणि पाण्यातून प्रवास करताना कॅमेऱ्यात टिपलेल्या या तरुण आणि तितकाच मोहक अलाद्दिनचा व्हायरल व्हिडीओ पाहून हे सत्य तुमचे डोळे नाकारू शकत नाहीत. हा व्हिडीओ एकदा पाहिला की तो वारंवार पाहण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…

एका YouTube युजरने @RhyzOrDie नावाच्या चॅनवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, एक माणसाला पांढर्‍या आणि पिवळ्या किनारी असलेल्या चमकदार चादरीवर बसलेला आहे. अगदी हुबेहुब अरेबियन नाइट्सच्या गोष्टींमधल्या अलाद्दिनसारखाच हा व्यक्ती अनेक गल्लीबोळ्यातून, कधी रस्त्यावरून तर कधी पाण्यावरून हा अलादीन फिरताना दिसून येतोय. आजूबाजूचे लोक आणि नेटिझन्स सुद्धा हे पाहून थक्क झाले. अलाद्दिन पुन्हा पृथ्वीवर अवतरला की काय, असं साऱ्यांना वाटू लागतं.

हा अलाद्दिन त्याच्या जादूच्या चादरीवर बसून हवेत उडताना दिसून येतोय. जो केवळ जमिनीवरच नाही तर पाण्याच्या पलीकडेही जातो. पण या तरंगत्या चादरीमागचं रहस्य काय आहे, तसंच हे घडवून आणण्यासाठी अलाद्दिनला जिनीच्या जादुई युक्तीने मदत केली आहे की विज्ञानाचा काही खेळ आहे का? असे अनेक प्रश्न पाहणाऱ्यांच्या मनात येत आहेत.

आणखी वाचा : फ्रिजखाली चिरडणार होता हा चिमुरडा.., एका ट्रेच्या मदतीने वाचवला जीव, VIRAL VIDEO मध्ये पाहा कसं ते…

अपलोड केलेल्या व्हिडीओवरील कमेंट्सनुसार, YouTuber ने या स्टंटसाठी ‘eFoil बोर्ड’ वापरला आहे. इलेक्ट्रिक प्रोपेलरसह सर्फबोर्ड वापरला असेल का? “ईफॉइल रायडरला समुद्रातील लाटांवर पॅडल करण्याची किंवा गतीमान करण्यासाठी पायांनी पंप करण्याची आवश्यकता नसते. ईफॉइल हे मुळात जगातील सर्वात लहान वैयक्तिक, मोटार असलेले वॉटरक्राफ्ट आहे,” असं WindFoilZone ने स्पष्ट केलंय.

आणखी वाचा : सोशल मीडियावर आगीसारखा पसरतोय ‘फायर पाणीपुरी’चा VIRAL VIDEO, पाहून तुम्ही व्हाल हैराण!

हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झालेल्या एका दर्शकाने यूट्यूबवर कमेंट करताना लिहिलं की, ‘हा खरोखरच मस्त व्हिडीओ आहे आणि जेव्हा तुम्ही पाण्यात सनसेटच्या वेळी असता तेव्हा खूप छान व्हिडीओ येतो!’ आणखी एका दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, ‘मजेची गोष्ट म्हणजे जेव्हा अलाद्दिन दोन गाड्यांमधून ट्रॅफिकच्या नियमाविरूद्ध प्रवास करत होता, त्यातील एक कार दुबई पोलिसांची होती आणि त्यांनी त्याला सायरनचा आवाज दिला, पण त्याने पोलिसांकडे दुर्लक्ष केलं आणि थांबण्यास नकार दिला.” हा व्हिडीओ पाहून दुबईच्या रस्त्यावर अलाद्दिनच्या फिरण्याचा लोक आनंद घेत आहेत.