Virar local viral video: मुंबईत लोकल ट्रेननं प्रवास करणं काही सोपं काम नाही. अन् त्यात जर का तुम्ही विरार लोकलनं प्रवास करत असाल तर मग काय विचारायलाच नको. कारण विरार ट्रेनला इतकी प्रचंड गर्दी असते की मुंगीलासुद्धा पाय ठेवायला जागा मिळत नाही. अशा स्थितीत लोकं बसण्यासाठी नाही तर चक्क उभं राहण्यासाठी सुद्धा हाणामारी करतात. मुंबई लोकलनं प्रवास करणं काही सोपं काम नाही. दर मिनिटाला हजारो प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे अर्थातच या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की किंवा भांडणं वगैरे होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण सध्या एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये रात्रीच्या एक वाजता महिलांच्या डब्ब्यात चक्क पुरुषांचा लोंढा चढलाय..विरार लोकलमधील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तु्हीच सांगा यात नेमकी चूक कुणाची ?
आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विरार-चर्चगेट लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात एक नाही दोन नाहीतर अक्षरश: पुरुषांचा लोंढा चढला आहे. यावेळी महिलांच्या डब्यात एकच गोंधळ उडाला. आधीच महिलांनाही धड उभं राहायला जागा दिसत नाहीये अशातच हे पुरुष चढल्यानं महिला आरडा-ओरडा करु लागल्या. पुरुषांना खाली उतरा असं सगळ्या माहिला सांगत आहेत मात्र कुणीही खाली उतरण्यास तयार नाहीयेत. काही महिला घाबरलेल्याही दिसत आहेत मात्र तरीही हे पुरुष डब्याच्या आतमध्ये शिरताना दिसत आहेत. अशाप्रकारे पुन्हा एकदा महिला डब्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसत आहे. यामुळे विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार असा सवाल सगळे करत आहेत.
लोकलमध्ये महिलांच्या राखीव डब्यातून पुरुष प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. मात्र असे असतानाही पुरुष प्रवाशांकडून त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) प्रयत्न केला जात आहे. तीन वर्षांपूर्वी वाशी ते ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावर पहाटेच्या सुमारास लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या एका मुलीचा विनयभंग करण्यात आला होता.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संतापले असून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हंटलंय, “काहीही असलं तरी महिलांचा डब्बा आहे नियमानुसार पुरुष या डब्यात चढू शकत नाही” तर आणखी एकानं, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.