Virar local shocking video: मुंबईत लोकल ट्रेननं प्रवास करणं काही सोपं काम नाही. अन् त्यात जर का तुम्ही विरार लोकलनं प्रवास करत असाल तर मग काय विचारायलाच नको. कारण विरार ट्रेनला इतकी प्रचंड गर्दी असते की मुंगीलासुद्धा पाय ठेवायला जागा मिळत नाही. अशा स्थितीत लोकं बसण्यासाठी नाही तर चक्क उभं राहण्यासाठी सुद्धा हाणामारी करतात. मुंबई लोकलनं प्रवास करणं काही सोपं काम नाही. दर मिनिटाला हजारो प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे अर्थातच या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की किंवा भांडणं वगैरे होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण सध्या एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये विरार लोकलच्या महिलांच्या डब्ब्यात एका पुरुषांनं महिलांसोबत धक्कादाय प्रकार केला आहे. विरार लोकलमधील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विरार-चर्चगेट लोकलमध्ये महिला किती असुरक्षित आहेत हे पाहायला मिळालं आहे. झालं असं की, विरार ते दादर ट्रेनने प्रवास करताना खूप भयावह असा अनुभव आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा इसम आहे त्याने खूपच उद्रेक केला. तो कधी खिडकीतून हात घालण्याचा प्रयत्न करतोय तर कधी दरवाजातून आतमध्ये डोकावताना दिसत आहे. तसेच कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लाथा बुक्या मारत शिवीगाळ करत होता. त्याने खूप हैदोस घातला होता. दरम्यान यावेळी महिलांनी जेव्हा रेल्वे हेल्पलाईनला फोन केला तेव्हा अर्धा तास कॉल करून काहीच मदत मिळाली नाही.

. अशाप्रकारे पुन्हा एकदा महिला डब्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसत आहे. यामुळे विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार असा सवाल सगळे करत आहेत.

पाहा व्हिडीओ

लोकलमध्ये महिलांच्या राखीव डब्यातून पुरुष प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. मात्र असे असतानाही पुरुष प्रवाशांकडून त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) प्रयत्न केला जात आहे. तीन वर्षांपूर्वी वाशी ते ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावर पहाटेच्या सुमारास लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या एका मुलीचा विनयभंग करण्यात आला होता.