ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत विराट कोहलीने जबरदस्त डान्स केला. या डान्सच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. काळा कुर्ता आणि पांढरा पायजमा घालून आला होता. पार्टीत विराटचा डान्स बघून सगळेच त्याचं कौतुक करत होते. बुधवारी मॅक्सवेलच्या लग्नाची पार्टी आरसीबी बायो बबलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

विराट कोहली काळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घालून पार्टीत पोहोचला. कोहलीचा या लुक मधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. कोहलीने पार्टीत इतर खेळाडूंसोबत डान्सही केला.

(हे ही वाचा: सासूने ओवाळून नववधूच्या डोक्यातच घातला नारळ; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)

संघात समाविष्ट असलेला वेस्ट इंडिजचा क्रिकेटर रदरफोर्डने इंस्टाग्राम लाइव्ह केले, ज्यामध्ये विराट कोहली डान्स करत होता. त्याच्यासोबत कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि इतर खेळाडूही होते.

(हे ही वाचा: ट्रॅफिक पोलिसांसोबतच रस्त्याच्या मधोमध पठ्ठ्याने केला डान्स; Video सोशल मीडियावर व्हायरल)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(हे ही वाचा: कराची विद्यापीठामध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्ला करणाऱ्या महिलेच्या पतीचं ट्विट viral, “तुझ्या निःस्वार्थी कृत्याने मला…”)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाला बुधवारी एक महिना पूर्ण झाला आहे. त्याने २७ मार्च रोजी ऑस्ट्रेलियात विनी रमनशी लग्न केले आणि लगेचच आयपीएलसाठी भारतात आला. त्यांच्यासोबत विनीही आली. मॅक्सवेल आणि विनी यांनी बुधवारी त्यांच्या आयपीएल फ्रँचायझी (RCB संघ) साठी एक महिन्यानंतर पार्टी आयोजित केली होती.