Vishwas nangare patil video: ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती..”गाव” प्रत्येक शहरवासी/चाकरमानी यांच्या मनातील एक हळवा कोपरा. कौलारू घर, सारवलेलं अंगण, अंगणातील रांगोळ्या, तुळशी वृंदावन, गावाशेजारी खळाळत वाहणारी नदी. अत्याधुनिक सुविधांमुळे जीवन सुखकर झाले असले, तरी मनाला शांतता देण्यासाठी, रोजची धावपळ आणि ऑफिसच्या ताणतणावांना विसरण्यासाठी शहरी मंडळी सध्या गावाकडे धाव घेत आहेत.अशातच आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनीही गावची वाट धरली अन् मनसोक्त आनंद लुटला. विश्वास नांगरे पाटील यांनी भर उन्हात पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला असून त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रुबाबदार आणि डॅशिंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले विश्वास नांगरे पाटील हे तरुणांचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. कडक शिस्त आणि तडफदार अधिकारी असलेल्या विश्वास नांगरे पाटीलांची डॅशिंग आयपीएस म्हणून ओळख आहे. 26/11 रोजी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये दहशतवादी घुसले असताना जीवाची पर्वा न करता आत शिरलेल्या जिगरबाज पोलीसांमध्ये नांगरे पाटीलही होते. कडक शिस्तीच्या विश्वास नांगरे पाटील त्यांच्या वयैक्तीक आयुष्यात मात्र फार वेगळे पाहायला मिळतात. नुकताच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते नदीमध्ये मनसोक्त पोहण्याचा आनंद घेताना डुबक्या मारताना दिसत आहेत. तसेच मज्जा मस्ती करतानाही दिसत आहेत. हा व्हिडीो शेअर करताना विश्वास नांगरे पाटलांनी आज फिर जीने की तमन्ना हैं ! असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. विश्वास नांगरे पाटलांची दुसरी बाजू पाहायला मिळाली असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. एका युजरने यावर “जीवन असेच आनंदात जगायचे असते… यालाच तर खरे सुख बोलतात.” अशी कमेंट केली आहे.