Metro video: कोलकात्यातील हावडा मेट्रो स्टेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत स्टेशनची अवस्था पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. नव्याने रंगवलेल्या भिंती असूनही त्यावर गुटखा आणि पानाचे लाल डाग दिसत आहेत. गंमत म्हणजे हे सगळं त्या बोर्डखाली घडतं आहे, ज्यावर लिहिलं आहे, ‘थुंकल्यास ₹ ५०० दंड’ म्हणजेच दंडाची सूचना वर आणि खाली थुंकल्याचे डाग! हे पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
हा व्हिडीओ एका पंजाबी व्लॉगरने शूट केला आहे, जो कोलकात्यात फिरायला आला होता. त्याने हावडा मेट्रो स्टेशनच्या एस्क्लेटरजवळील भागात हे दृश्य शूट केले आहे. व्हिडीओत तो चालत जातो आणि कॅमेऱ्यात दाखवतो “पाहा, किती छान सुविधा दिल्या आहेत; पण लोकांना संस्कार नाहीत. ते सगळं उद्ध्वस्त करतात.” त्याचा आवाज आणि त्या दृश्यातील विरोधाभास पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला.
कारण- हे तेच मेट्रो स्टेशन आहे, जिथे नवीन एस्कलेटर, टाइल्स आणि स्वच्छता राखली जावी म्हणूून नुकतेच सीसीटीव्ही अशा प्रकारे नूतनीकरण करून छान सजवले गेले होते. पण तरीसुद्धा, लोकांचा बेजबाबदारपणा अजूनही तसाच असल्याचे या व्हिडीओतून दिसतंय.व्हिडीओ सोशल मीडियावर टाकताच काही तासांतच हजारो लोकांनी तो पाहिला. ट्विटरवर तर तो मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला. लोकांमध्ये नागरी जाणिवेचा अभाव आहे”, असे म्हणत अनेकांनी या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली.
पाहा व्हिडिओ
एका युजरने लिहिले — “गुटखा बनवणाऱ्या कंपन्यांवरच दंड लावा, त्यांच्यामुळेच सार्वजनिक ठिकाणं घाण होत आहेत.” तर दुसरा युजर म्हणाला — “सीसीटीव्ही नीट तपासा, थुंकणाऱ्यांवर मेट्रोमध्ये कायमची बंदी घाला. मीच हे काम करतो, मला नोकरी द्या मेट्रोमध्येच!” या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की, फक्त दंडाचे बोर्ड लावून काही होत नाही, जोपर्यंत लोकांना सार्वजनिक ठिकाणांबद्दल मनापासून आदर वाटत नाही.
एकूणच, कोलकात्यापासून दिल्लीपर्यंत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेच्या घटना वाढताना दिसत आहेत. सरकार दंड आकारते, पण जर नागरिकांनी स्वतः जबाबदारी घेतली नाही, तर कितीही आधुनिक सुविधा दिल्या तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही. हावडा मेट्रो स्टेशनचा हा व्हायरल व्हिडीओ त्याचं जिवंत उदाहरण आहे.
