ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप हा दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याच्या मदतीने, आपण कधीही, कुठेही कमी वेळेत फूड ऑर्डर करू शकतो. यामध्ये डिलिव्हरी बॉयचे विशेष योगदान आहे, जे खराब हवामानातही ग्राहकांच्या ऑर्डर वेळेवर पूर्ण करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतात. मात्र, एका डिलिव्हरी बॉयने मर्यादा ओलांडल्या.

ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करण्याऱ्या फूड डिलिव्हरी बॉयच्या संघर्षाच्या गोष्टी अनेकदा इंटरनेटवर चर्चेत येत असतात. कधी कोणी उपाशी राहून तर कोणी भर पावसातही आपले काम करतो. पण सध्या एका वेगळ्याच कारणासाठी झोमॅटोचा फूड डिलिव्हरी बॉय चर्चेत आला आहे. कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका ग्राहकाने त्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – काय सांगता! जपानमध्ये विद्यार्थ्यांऐवजी शाळेत जाणार रोबो; घरबसल्या गैरहजर मुलं करणार अभ्यास

झोमॅटो डिलिव्हरी बॉयने केला धक्कादायक मेसेज(फोटोसौजन्य- ट्विटर, साक्षी जैन)
झोमॅटो डिलिव्हरी बॉयने केला धक्कादायक मेसेज(फोटोसौजन्य- ट्विटर, साक्षी जैन)

डिलिव्हरी बॉयने केला धक्कादायक मेसेज?

एका फूड डिलिव्हरी बॉयने एक पाऊल पुढे जाऊन ग्राहकाला मेसेज केला, “मी तुमची ऑर्डर घेऊन येत आहे.”‘आणखी काही हवंय. सिगारेट, सीक्रेट गांजासारखे?’ हिंदीमध्ये हा मेसेज आला होता. साक्षी जैन नावाच्या ट्विटर युजरने तिच्या एका ट्विटमध्ये स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले – ‘माझ्या रूममेटने काल रात्री @zomato वरून ऑर्डर दिली आणि डिलिव्हरी बॉयने तिला हा मेसेज पाठवला.’ स्क्रीनशॉटमध्ये डिलिव्हरी बॉयसोबत चॅट दिसत होता.

हेही वाचा – पाय फ्रॅक्चर असूनही लाठी-काठी खेळ सादर करतायेत ‘या’ वॉरिअर आजी, व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ट्विट व्हायरल झाले आहे, लोकांकडून मजेदार प्रतिक्रियांचा पूर आला आहे, काही लोक डिलिव्हरी एजंट किती काळजी घेतात हे उपाहात्मकपणे म्हणत आहे. आणखी एकजण म्हणाला, “प्रत्येकाला असे डिलिव्हरी लोक मिळू दे.” दुसरा म्हणाला, “पहाटे २ वाजता ऑर्डर करा… तुम्हालाही अशी चौकशी मिळेल.”