टु एफएलओ एफसी बांडुंग (2 FLO FC Bandung) आणि एफबीआय सुबांग यांच्यातील मैत्रीपूर्ण सामन्यादरम्यान वीज पडून एका इंडोनेशियन फुटबॉलपटूचा मृत्यू झाला. पश्चिम जावाच्या बांडुंग (Bandung, West Jav) येथील सिलीवांगी (Siliwangi) स्टेडियमवर सुबांग ( Subang ) टीमच्या ३५ वर्षीय पुरुष खेळाडू वीज पडल्याच्या घटनेत मृत पावला. हा थरारक क्षण व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला आहे. मृत्य खेळाडूचे नाव सेप्टेन राहरजा (Septen Raharja) म्हणून असल्याचे समोर आले आहे.

स्थानिक मीडिया पीआरएफएम न्यूजनुसार, “फुटबॉलपटू या घटनेनंतरही श्वास घेत होता आणि त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तीव्र भाजल्याने त्याचा मृत्यू झाला.”

रेफरींगच्या नियमपुस्तकानुसार, “रेफरी जगाच्या बहुतांश भागात खराब हवामानाचा अर्थ लावतात. नेदरलँड्समध्ये, ८ फेब्रुवारी २०२0 रोजी देशातील वाऱ्याच्या वेगामुळे सर्व फुटबॉल खेळ निलंबित करण्यात आले होते.”

हेही वाचा – पुद्दुचेरीमध्ये कॉटन कँडीवर घातली बंदी? जाणून घ्या काय आहे त्यामागील कारणहेही वाचा – पुद्दुचेरीमध्ये कॉटन कँडीवर घातली बंदी? जाणून घ्या काय आहे त्यामागील कारण

रॉयल नेदरलँड्स फुटबॉल असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “क्लब, पोलिस आणि नगरपालिकांशी चर्चा केल्यानंतर, “अपेक्षित हवामानामुळे समर्थक आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेची हमी देता येत नाही, असा निष्कर्ष काढला आहे.”

गेल्या १२ महिन्यांत इंडोनेशियन फुटबॉल खेळाडूच्या अंगावर वीज पडण्याची ही दुसरी दु:खद घटना आहे.

हेही वाचा – काय सांगता? महिलने चक्क नळाखाली धुतले नान अन् मग खाल्ले, व्हायरल व्हिडिओची चर्चा

पूर्व जावा येथील बोजोनेगोरो येथील एक तरुण फुटबॉल खेळाडूवर २०२३ मध्ये सोएराटिन अंडर-१३ चषकादरम्यान वीज पडली होती. . २०२३ मध्ये, ब्राझीलमधील खेळपट्टीवर असताना २१ वर्षीय ब्राझिलियन फुटबॉल खेळाडूच्या अंगावरही वीज पडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Caio Henrique de Lima Goncalves नावाच्या २१ वर्षाचा खेळाडू, दक्षिणेकडील पराना राज्यातील कप फिक्स्चरमध्ये त्याच्या उनियाओ जैइरेन्स संघाकडून खेळत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली होती. खेळपट्टीवर कोसळल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र नंतर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला.