सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने खूप थंडी पडतं आहे. शिवाय उत्तरेकडील राज्यात तर शरीर गोठवणारी थंडी असते. त्यामुळे दिल्लीतील लोकांना सध्या थंडीचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. तर हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली आणि उत्तर-पश्चिम भारतातील लोकांना येत्या २४ तासांनंतर थंडीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. पण अशा परिस्थितीत लोक थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी उबदार कपडे, शालचा वापर करताना दिसत आहेत.

पण अशा शरीर गोठावणाऱ्या थंडीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी एका तरुणाने असं काही केलं आहे. ते पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून आपण घट्ट आणि कपडे घालतो, पण किती कपडे घालावेत त्यालाही काही मर्यादा असतात. मात्र, या व्हिडीओतील तरुणाने इतके कपडे घातले आहेत की, ते मोजायलाच तब्बल एका मिनिटाहून अधिक वेळ लागला आहे.

हेही पाहा- “आम्हा दोघांमध्ये तेव्हा दुसरं कुणीच…,” रतन टाटा यांनी खास व्यक्तीसह शेअर केला फोटो

शिवाय त्याच्या अंगावर १५ ते २० शर्ट असल्याचं सुरुवातीला दिसत आहे. मात्र, शेवटपर्यंत मोजल्यास त्याहूनही अधिक कपडे या व्यक्तीच्या अंगावर असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ @JBreakingBajpai नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ट्विटर धारकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘मोजा आणि सांगा, थंडीपासून बचाव करण्यासाठी या तरुणाने किती कपडे घातले आहेत?’ तर या व्हिडीओमध्ये या तरुणाने निळ्या रंगाचे जॅकेट घातल्याचं दिसत आहे. शिवाय तो खूप जाड दिसत आहे. अशा स्थितीत दुसरा व्यक्ती त्याचे कपडे मोजताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहतना सुरुवातीला या व्यक्तीने एक, दोन जास्तीत जास्त ५ ते ६ कपडे घातले असतील असं आपणाला वाटतं.

हेही पाहा- “हेल्मेट का नाही घातलं?” पोलिसांच्या प्रश्नावर तरुणीचं भन्नाट उत्तर, Video पाहिल्यानंतर पोट धरून हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण जवळपास १ मिनिटापर्यंत त्या तरुणाचे कपडे मोजले तरीही त्याच्या अंगावरील शर्ट संपल्याचं दिसत नाही. त्यामुळे या व्यक्तीच्या अंगावर १५ पेक्षा जास्त कपडे असल्याचं दिसत आहे. तर या व्हिडीओची भुरळ अनेकांना पडली आहे. त्यामुळे एका माजी आयपीएसने अधिकाऱ्याने हा व्हिडीओ रिट्विट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘इतकी थंडी तर टुंड्रामध्येही नाही.’ सध्या हा व्हिडीओ अनेकांच्या मनोरंजनाचा विषय ठरला आहे.