प्रँक करणे खूप मजेदार असू शकते, परंतु जर याने लोकं घाबरली तर त्याचा वेगळा परिणाम पण दिसून येऊ शकतो. मात्र प्रँक केल्याने लोकांकडून आपल्याला खरी प्रतिक्रिया मिळते. जी कधी मजेशीर तर कधी भीतीदायक सुद्धा असू शकते. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये राजस्थान मध्ये ‘मंजुलिका’ नावची भूत फिरताना दिसतेय. जाणून घेऊया यामागचे नेमकं प्रकरण..

‘भूल भुलैया’ या बॉलिवूड चित्रपटाचा ‘सीक्वल’

‘भूल भुलैया’ हा हिंदी चित्रपट तुम्ही पाहिला असेलच आणि त्यातील मंजुलिकाची व्यक्तिरेखाही तुम्हाला आठवत असेल. असाच काहीसा प्रकार राजस्थानमधील एका राजवाड्यात पाहायला मिळाला. इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ‘मंजुलिका’ सारखी वेशभूषा केलेल्या एका मुलीला पांढरी चादर पांघरून लोकांना घाबरवताना दाखवले आहे.

Truck driver do this jugad to save himself from the heat is video goes viral
Desi Jugaad: उकाड्यापासून वाचण्यासाठी पठ्ठ्याचा ट्रकमध्ये हटके जुगाड; VIDEO पाहून चक्रावून जाल
Woman attends online meeting on scooter amid traffic jam Watch
Work-Life Balance, ते काय असतं? इथे भर रस्त्यात स्कूटर चालवत तरुणीची मोबाईलवर सुरु आहे ऑफिस मिटिंग, पाहा Video
Heart Attack Shocking Video
भयानक घटना! भाच्याच्या लग्नात आनंदाने नाचत होता मामा; पण पुढच्याच क्षणी कोसळला अन्…थरारक VIDEO पाहून फुटेल घाम
anil weds samasya Viral Photo
“अरे हिच्या नावातच समस्या” वधू-वराच्या नावाचा व्हायरल PHOTO पाहून युजर्सला हसू आवरेना; म्हणाले….

भरतपूरची हवेली आणि भूत..

या व्हिडिओमध्ये महिलेने लांब केसांचा वीग घातला असून अंगाभोवती पांढरी चादर गुंडाळलेली दिसत आहे. ही महिला राजस्थानमधील भरतपूर येथील हवेलीभोवती फिरते आणि लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करते. हे अगदी खरंखुरं भासवण्यासाठी तिने तिचे केसही मोकळे सोडले आहेत. लोक या मंजुलिकाला घाबरतही आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, भरतपूरच्या रहिवाशांना घाबरवण्यासाठी मंजुलिकासारखे कपडे घातले आणि मग काय झाले ते पहा. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, जेव्हा लोक मुलीला कुठूनतरी उडी मारताना पाहतात तेव्हा ते जोरजोरात ओरडू लागतात.

(हे ही वाचा: किराणा दुकानात २ उंदरांची तुफान मारामारी; कधीही पाहिला नसेल असा Viral Video)

१.२५ लाख वेळा व्हिडिओ पाहण्यात आला..

हा व्हिडिओ प्रिशा या ट्विटर युजरने पोस्ट केला आहे. तो आतापर्यंत सुमारे १.२५ लाख वेळा पाहिला गेला आहे. तसंच हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे आणि शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, हे अद्भुत आहे !! माझी माणसं आणि मी भरतपूर अभयारण्याच्या सहलीनंतर या पॅलेस रिसॉर्टमध्ये राहिलो, आणि मला आठवते की ही सेटिंग मणिचित्रथाझू – मल्याळम चित्रपटाशी मिळती जुळती आहे ज्याने शेवटी भूल भुलैयाला प्रेरित केले.” दुसर्‍या व्यक्तीने लिहिले की, खरोखरच एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला पाहिजे. इतकं विनोदी असणं चांगलं नाही. सर्व काही मजेशीर आणि खेळ नसतात. आणखी एका वापरकर्त्याने प्रश्न उपस्थित केला. त्याने विचारले, ठीक आहे, हे पाहून मला हृदयविकाराचा झटका आला तर त्याचे बिल कोण भरणार?