तुम्ही आतापर्यंत नदीला पुर आल्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. जरासा पाऊस झाला की रस्त्यांना नद्यांचे स्वरुप येते हे देखील पाहिले असेल पण एका शहरातील रस्त्यांवर चक्क दारू वाहताना तुम्ही पाहिली आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये असे दृश्य पाहायला मिळत आहे, जे पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही. खरंतर, व्हायरल व्हिडीओमध्ये रस्त्यावरून रेड वाईनची नदी वाहताना दिसत आहे. (river of red wine) जे पाहून नागरिकांना धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोर्तुगालमध्ये (Portugal) साओ लॉरेंको डी बॅरो (Sao Lorenco de Bairro) शहरातील एका उंच टेकडीवरून लाखो लीटर रेड वाईन रस्त्यावर वाहून गेल्याने ही स्थिती निर्माण झाली. व्हिडीओमध्ये शहरातील रस्त्यांवरून रेड वाईनची नदी वेगाने वाहताना दिसत आहे. लोकांना हे पाहून आश्चर्य वाटणे सहाजिक आहे.

हेही वाचा – कोण होईल सर्वात आळशी नागरिक? गेल्या २० दिवसांपासून लोळत पडले आहेत स्पर्धक, ‘या’ देशात सुरू आहे विचित्र स्पर्धा

६००,००० गॅलन दारू वाहून नेणारे बॅरल्स अनपेक्षितपणे कोसळल्याने ही घटना घडली.. ही एक प्रचंड मोठी गळती आहे आणि हा प्रवाह इतका जोरात होता की, तो एक जलतरण तलाव भरू शकतो, या घटनेने पर्यावरणीय धोक्याचा इशारा दिला आहे. कारण रस्त्यावरून वाहणारी ही दारू शहराजवळील नदीकडे जात होती. शहरातील इतर भागात वाहणारी दारू दारूच्या कारखान्याजवळील घराच्या तळघरात साठवून ठेवली होती.

शहरातील सर्तिमा नदीचे दारूच्या नदीमध्ये रूपांतर होण्यापूर्वीच हा प्रवाह रोखण्यासाठी अग्निशमन विभागाने कारवाई सुरू केली. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, रेड वाईनच्या प्रवाहाची दिशा वळवण्यात आली आहे आणि ती जवळच्या शेतात सोडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – नवरा निघाला चुलत भाऊ! लग्नाच्या ३ वर्षांनी समजले धक्कादायक रहस्य, पत्नीला बसला धक्का…

दरम्यान, लेविरा डिस्टिलरीने(कारखाना) या विचित्र घटनेबद्दल माफी मागितली आहे आणि आश्वासन दिले आहे की “आम्ही सर्व साफसफाई आणि नुकसान दुरुस्तीशी संबंधित खर्चाची संपूर्ण जबाबदारी घेतो, आमची टीम त्वरित त्यावर काम करत आहेत.”