करोना महामारीच्या संकटामुळे बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा(WFH ) पर्याय दिला आहे. काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय चांगलाच आवडलाय, पण काही कर्मचाऱ्यांसाठी मात्र हा पर्याय मोठी डोकेदुखी ठरतोय.
कुटुंबीयांसमवेस असताना ऑफिसचं काम करणं अनेकांसाठी अडचणीचं ठरतंय. गेल्या वर्षी झूम अॅपवरील व्हिडिओ मीटिंगचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता एक नवीन व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत असून यात लाइव्ह मीटिंग सुरू असताना एका व्यक्तीची पत्नी चक्क त्याला ‘किस’ (Kiss) करण्यासाठी येत असल्याचं दिसतंय. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
एक माणूस लाइव्ह मीटिंगमध्ये प्रेजेंटेशन देत असतानाच त्याची पत्नी मागून येते आणि त्याला ‘किस’ करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तो माणूस आपला चेहरा मागे घेतो आणि ‘मी ऑन एअर आहे’ असं म्हणत पत्नीला झापतो. पती लाइव्ह असल्याचं समजताच पत्नीला हसायला येतं आणि ती निघून जाते, व पती पुन्हा मीटिंगमध्ये सहभागी होतो. रुपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना ‘वर्क फ्रॉम होम संकटात’ असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.
बघा व्हिडिओ :-
#Perils of #WorkFromHome#WFH
As received on whatsapp. pic.twitter.com/dVpQ7CSTJf— Rupin Sharma IPS (@rupin1992) February 13, 2021
हा व्हिडिओ १३ फेब्रुवारीला शेअर करण्यात आला होता, तेव्हापासून आतापर्यंत हजारो जणांनी व्हिडिओ पाहिला असून त्यावर युजर्सच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.