Wedding Viral Video: सध्या लग्नसमारंभ जोरात सुरू आहेत. लोकांना आपल्या लग्नाचा दिवस अतिशय खास बनवायचा असतो. त्यासाठी त्याचं नियोजन खूप आधीपासून केलं जातं. सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नातील डान्स, अनोख्या प्रथा, गाणी, नवरा-नवरीचे भन्नाट किस्से व्हायरल होत असतात. लग्न हा माणसाच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर व अविस्मरणीय दिवस असतो; पण अनेकदा एका चुकीमुळे लग्नाचा हा खास दिवस खराबसुद्धा होऊ शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या लग्नामध्ये नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

अनेकदा वधू-वरांना वेगवेगळ्या पद्धतीनं लग्नमंडपात एन्ट्री घेताना तुम्ही पाहिलं असेल. त्यात गैर काहीच नाही. कारण- प्रत्येक वधू-वराचे स्वप्न असते की त्यांच्या लग्नाची एन्ट्री ही ग्रँड पद्धतीने व्हावी. पण, काही वेळा ग्रँड एन्ट्रीच्या नादात अपघात होतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आजकाल लग्नांमध्ये दिखाव्यासाठी बऱ्याच गोष्टी घडू लागल्या आहेत. लोक सोशल मीडियावर व्हिडीओ पाहतात आणि त्यात असं दिसून येतं की, एका जोडप्यानं त्यांच्या लग्नात काहीतरी नवीन केलं आहे. नंतर इतरही त्याच स्पर्धेत उतरतात आणि त्यांच्या लग्नात त्या गोष्टी करू लागतात. अशा प्रकारे वेळोवेळी ट्रेंड बदलत राहतो आणि लोक त्या त्याप्रमाणे गोष्टी फॉलो करू लागतात. जर तुम्ही सोशल मीडियावर असाल, तर तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील आणि काही व्हिडीओंमध्ये तुम्ही असंही पाहिलं असेल की, ट्रेंड फॉलो करताना अपघातदेखील होतात. सध्या असंच काहीतरी या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसलं.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दाखवण्यात आले?

तुम्ही पाहिलं असेल की, आजकाल अनेक लग्नांमध्ये, दिखाव्याच्या नावाखाली, प्रत्येक वधू-वराला गोळीबाराची गंमत अनुभवण्यासाठी एक स्पार्कल फायर गन दिली जाते, ज्यामध्ये ते प्रवेश करतात किंवा एकाच ठिकाणी उभे राहतात. व्हायरल व्हिडीओमध्ये असेच काहीतरी दिसले. त्यामध्ये वधू-वर गाडीच्या छतावरून बाहेर पडताना स्पार्कल फायर गन वापरत आहेत आणि यादरम्यान वधूच्या हातात असलेली फायर गन अचानक फुटते आणि या स्फोटामुळे वराच्या पगडीला आग लागते; पण तो अजूनही दिखाव्यामध्ये व्यग्र असतो. कारण- त्याच्या पगडीला आग लागल्याची जाणीव त्याला झालेली नसते. ते पाहून तेथील उपस्थित पाहुणे मंडळींना मोठा धक्काच बसतो. पाहुणे मंडळी धावत जातात आणि फेट्याला लागलेली आग विझवतात. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

तुम्ही आताच पाहिलेला व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत अनेकांनी व्हिडीओ पाहिला असेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने कमेंट करीत लिहिले, “आजच्या लग्नांमध्ये आश्चर्यकारक नाट्य आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “लग्न म्हणजे लग्न नाही, तर त्याचा अर्थ दिखावा आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “हे धोकादायक होते. जर तो वाचला नसता, तर…” नेटकऱ्यांनी अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.