वाहतुकीचे असे विचित्र नियम जे तुम्ही कधी ऐकलेही नसतील!

तर भारतात अर्ध्याहून अधिक लोकांना दंड भरावा लागेल

प्रातिनिधीक छायाचित्र

आपण वाहतुकीचे साधे नियमही पाळत नाही. सिग्नलला गाडी थांबवणे, गाडी चालवताना सिटबेल्ट लावणं किंवा हेल्मेट घालणं, सिग्नल न मोडणे असे साधे सोपे नियम आहेत पण तेही आपल्याला पाळता येत नाही. का कोण जाणे पण आपल्याला हे नियम काही पटत नाही. पण आता आम्ही तुम्हाला काही विचित्र नियमांबद्दल सांगणार आहोत जे वाचून तुम्हाला आपल्याकडचे नियम त्यापेक्षा बरे असं वाटू लागेल.

– रशियामध्ये अस्वच्छ कार रस्त्यावरून चालवली तर चालकाला मोठा दंड भरावा लागतो. तिथे अस्वच्छ कार चालवण्याची परवानगी नाही. हा दंड जवळपास २००० हजार रुबल्स म्हणजे साडेतीन हजारांच्या घरात आहे. जर असा नियम आपल्याकडे आला तर अर्ध्याहून अधिक लोकांना हा दंड भरावा लागेल हे नक्की.
– आपल्याकडच्या रस्त्यावर गाडी चालवताना एकमेकांच्या अंगावर ओरडणं किंवा समोरच्या व्यक्तीची चूक झाली की त्याला शिव्या घालण्याची वाईट सवय असते. रस्त्यावर वाहतूक कोंडीत सापडले की एकमेकांशी भांडणं करणं, हुज्जत घालणे असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. पण मेरीलँडमध्ये जर तुम्ही असं केलंत तर मात्र तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या कोणत्याही चालकाला दुसऱ्या चालकावर ओरडण्याची किंवा शिव्याशाप देण्याची इथे पद्धत नाही. जर हा नियम भारतात लागू झाला तर जवळपास सगळ्यांना दंड भरावा लागेल हे नक्की

– चालकाला जर चष्मा असेल तर अशा चालकांनी गाडीमध्ये आणखी एक दोन चष्म्याची जोडी ठेवणं स्पेनमध्ये बंधनकारक आहे. असं नाही केल्यास वाहतूक पोलीस तुमच्याकडून दंड आकारू शकतात.
– स्वीडनमध्ये गाडी चालवताना २४ तास आपल्या कारची हेडलाईट चालू ठेवणं बंधनकारक आहे. अनेकदा हिवाळ्यात भरदिवसाही इथे पुरेसा प्रकाश नसतो तेव्हा चालकांनी रात्रीच नाही तर दिवसाढवळ्या देखील गाडीची हेडलाइट सुरू ठेवणं बंधनकारक आहे.
– सौदी अरेबियामध्ये महिलांना गाडी चालवायला परवानगी नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Weird traffic laws around the world