. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आपल्या आवडत्या गाण्यांवर सोशल मीडियावर असे एकापेक्षा एक व्हिडिओ रोज पाहायला मिळतात ज्या लोक बिनधास्तपणे नाचत असतात. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना कधी कधी लोकांना प्रचंड आवडतात. सध्या सोशल मीडियावर अनेक जण चर्चेत असलेल्या गाण्यावर डान्स करताना दिसतात. पण फार मोजके लोक असे असतात जे खरोखर खूप सुंदर डान्स करतात. सध्या अशाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

नृत्य (डान्स ) ही कला आहे. ही कला जोपासावी लागते. प्रत्येक व्यक्ती तिला जमेल तसे डान्स करू शकते पण ज्यांना उत्तम डान्सर व्हायचे आहे असे लोक सातत्याने प्रयत्न करत राहतात आणि आपले सर्वोत्तम परफॉर्मन्स देतात. सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चिमुकलीचे चाहते झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर tvishabharti नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये चिमुकली आपल्या डान्स टिचरबरोबर डान्स करत आहे. चम चम करता है नशीला बदन या गाण्यावर चिमुकलीने अफलातून डान्स करत आहे. चिमुकली प्रत्येक डान्स स्टेप अचूकपणे करत आहे आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील तिच्या डान्सला साजेसे आहेत.

हेही वाचा –आता फक्त कपडे नव्हे तर माणसांनाही मशीनमध्ये धुता येणार? जपानी कपंनीने तयार केली माणसांना धुणारी मशीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिमुकलीचा डान्स नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. हा व्हिडिओला १,३५,०४७ लोकांनी पसंती दर्शवली आहे.व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ” शोला हु मै, बिजली भी हु!” पहिल्यांदाच मराठी गाण्यावर डान्स केला आणि वेड्यासारखा एन्जॉय केला. काय एक वाईब आहे. @अन्विशेट्टी मॅम तुमच्या नृत्यदिग्दर्शनाच्या आणि तुम्ही शिकवण्याच्या पद्धतीच्या मला खूप आवडते. तुम्ही मला नेहमी दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद.”