ते दिवस गेले जेव्हा डेटिंगचा अर्थ फक्त रिलेशनशिमध्ये राहणे इतकाच असायचा. रिलेशनशिप निर्माण करण्याच्या विविध टप्प्यांबद्दल वाढत्या जागरूकतेमुळे, आ डेटिंगच्या जगात प्रवेश करणाऱ्या नवीन अटी आणि ट्रेंड समोर येत असतात. 2023 मध्ये, ड्राय डेटिंगचा ट्रेंड तरुणाईमध्ये लोकप्रिय होत आहे कारण ते त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देत आहेत. या संकल्पनेबद्दल अधिक जाणून घेऊया आणि जेणेकरुण अशा रिलेशनशिपमध्ये राहावे की नाही हे तुम्हाला ठरविता येईल.

ड्राय डेटिंग म्हणजे काय?

ड्राय डेटिंग म्हणजे जेव्हा लोक त्यांच्या डेटवर गेल्यानंतर मद्यपान न करणे निवडतात. कोरोनानंतर जेव्हा लोक प्रत्यक्षात डेटिंगवर जाऊ लागले आणि त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाले तेव्हा हे सर्व सुरू झाले. मद्यपान आपल्या काही विचारांवर प्रभाव टाकू शकते किंवा अशा वेळी लोक पूर्णपणे स्वतःच्या निंयत्रणात नसतात. हे असे खोटे वर्तन टाळण्यासाठी आणि त्यांच्या डेटवरील जोडीदारासह एक चांगले भावनिक नातं निर्माण करण्यासाठी, डेटर्स त्यांच्या डेटवर मद्यपान न करण्याची निवड करतात, त्यामुळे ‘ड्राय डेटिंग’ या ट्रेंडची सुरुवात झाली.

डेटवर मद्य सेवन करण्याबाबत लोक करतायेत पुनर्विचार

पहिल्यांदा डेटवर गेल्यानंतर चिंताग्रस्त होणे आणि भयभीत होणे सामान्य गोष्ट आहे पण बरेच तरुण ही भिती आणि चिंता घालविण्यासाठी मद्याचा आधार घेतात. डेटवर गेल्यानंतर मद्यपान केल्यास तुम्ही कसे वागता यावर तुमचे नियंत्रण राहत नाही. तुम्ही नक्की कशी व्यक्ती आहात याबाबत नेमके मत समोरच्या व्यक्तीला तयार करता येत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण होऊ शकते. आता कित्येकजण डेटवर गेल्यानंतर त्यांच्या मद्यपानाच्या सेवनाबाबत पुनर्विचार करत आहे. बंबल या प्रसिद्ध डेटिंग अॅपने केलेल्या सर्व्हेनुसार, ५० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीय व्यक्तींनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, डेटवर गेल्यानंतर समोरील व्यक्तीचे मन कसे आहे आणि मद्यपान करत नाही नाही हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. सुमारे 45% प्रतिसादकर्ते त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक होते आणि त्यांना त्यांचे मद्य सेवन कमी करायचे होते. काहींनी उत्तर दिले की, ते फक्त त्यांच्या जोडीदाराला कंपनी देण्यासाठी पितात.

‘ब्लू व्हेल’च्या हृदयाचं वजन ऐकून भरेल धडकी! हृदयाचा एक ठोका पडताच… हर्ष गोएंका यांची Viral पोस्ट पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणाईसाठी सकारात्मक डेटींग ट्रेंड

डेटिंग टर्मिनोलॉजी सुरु करण्याचा हा नक्कीच एक सकारात्मक कल आहे. हे जोडप्याला अर्थपूर्ण संभाषण करण्यास आणि एकमेकांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यास सक्षम करेल. एकदा मद्यपान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जोडीदारासमोर स्वत:ला लाज वाटणार नाही असे काही घडू नये याकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे तुम्ही जोडीदाराकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:ला सावरण्यामध्ये व्यस्त होता. पण या ट्रेंडमुळे समरोच्या व्यक्तीसोबत तुमचे नाते कसे पुढे जाऊ शकते याचे मूल्यांकन करण्यास मदत होते. दोघांनाही एकमेकांसह चांगला वेळ घालविता येतो. मद्यपानाचा पर्याय काढून टाकल्यानंतर जोडप्यांना त्यांच्या पुढील डेटसाठी काही नवीन कल्पना सुचविण्यास देखील मदत होऊ शकते. त्यामुळे ड्राय डेटिंग हे तुम्ही डेटवर गेल्यांनतर एकमेकांसह चांगला वेळ घालविण्यासाठी मदत करत असल्याचे दिसते.