Fact check : सध्या सोशल मीडियावर साधारण ७२ मीटर उंचीचा एक भलामोठा उड्डाणपूल आणि त्यावर धावणाऱ्या गाड्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर व्हायरल होणारा व्हिडीओ हा भारतामधील असल्याचेही म्हटले जात असल्याचे लाइटहाऊस जर्नालिजमला आढळले आहे. मात्र, सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी शेअर केलेल्या आणि व्हायरल होणाऱ्या या भल्यामोठ्या आणि अवाढव्य अशा उड्डाणपुलाचा व्हिडीओ खरंच भारतातील गुजरात किंवा राजस्थानमधील आहे का, ते आपण पाहूया.

नेमके काय होत आहे व्हायरल?

तर फेसबुक या सोशल मीडियावर Shimmy Parambath नावाच्या वापरकर्त्याने हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच व्हिडीओला “मोदींची हमी, गुजरात” [Modi’s guarantee, Gujarat] असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये आपल्याला एक भलामोठा आणि नागमोडी वळणाचा उड्डाणपूल दिसतो आहे. तसेच त्यावर धावणाऱ्या विविध गाड्यादेखील पाहायला मिळतात.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आता या पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन बघा.

आर्काइव्ह व्हर्जन पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सोशल मीडियावरील इतर वापरकर्तेदेखील हा व्हिडीओ भारतातील असल्याचा दावा करत आहेत.

व्हिडीओ :

आता व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर जेव्हा तपास केला गेला, तेव्हा याबद्दल नेमकी कोणती माहिती समजली ती पाहा.

तपास :

आम्ही प्रथम व्हिडीओ डाउनलोड केले आणि InVid नावाच्या टूलमध्ये अपलोड करून याबद्दल तपास सुरू केला. अशा पद्धतीने आम्ही व्हिडीओमधील अनेक किफ्रेम्स मिळवल्या. नंतर प्रत्येक किफ्रेमवर एकेक करून रिव्हर्स इमेज सर्च केली, तेव्हा आम्हाला स्टॉक इमेज वेबसाइट, अलामी [alamy] वर एक चित्र सापडले.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या फोटोच्या कॅप्शनमध्ये, १६ जानेवारी २०१९, चीनमधील सर्वात उंच इंटरचेंज महामार्ग, सुजियाबा इंटरचेंजवर धावणाऱ्या गाड्या. चीनच्या चोंगकिंगमधील ७२ मीटर उंचीचा महामार्ग.

तसेच आम्हाला एका बातमीच्या अहवालातून एक व्हिडीओदेखील मिळाला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अहवालात नमूद केले आहे की, ७२ मीटर उंच उभा असलेला, सुजियाबा ओव्हरपास हा चीनमधील सर्वात उंच शहरातील रॅम्प ब्रिज आहे. त्याची नागमोडी रचना एखाद्या थरार रोलर कोस्टरसारखी दिसते.

इतकेच नाही, तर आम्हाला एका इन्स्टाग्राम प्रोफाइलवर व्हिडीओदेखील सापडला, ज्यामध्ये फ्लायओव्हरला वास्तुशास्त्रीय चमत्कार म्हणून वैशिष्ट्यीकृत केले आहे.

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक व्हिडीओंनी व्हायरल होणारा व्हिडीओ हा चीनमधील असल्याची पुष्टी केली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

निष्कर्ष:

सोशल मीडियावर व्हायरल होणारा तसेच भारतातील अनेक ठिकाणचा असल्याचा दावा ज्या उंच फ्लायओव्हरबद्दल केला जात आहे, तो दावा खोटा आहे. व्हायरल होणारा हा फ्लायओव्हरचा व्हिडीओ चीनमधील, चोंगकिंग येथील आहे, त्यामुळे सोशल मीडियावर होणारे व्हायरल दावे खोटे आहेत.