काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट बुधवारी हॅक करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यावेळी आक्षेपार्ह ट्विट्स टाकण्यात आले, हे ट्विट्स नंतर काढून घेण्यात आले. त्यानंतर काँग्रेसचे ट्विटर खातेही हॅक झाले. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अशाच प्रकारचे आक्षेपार्ह ट्विट्स करण्यात आले होते. हे ट्विट्स देखील अर्ध्यातासांत हटवण्यात आले. ट्विटर अकाऊंट पाठोपाठ काँग्रेस पक्षाचे संकेतस्थळदेखील हॅक करण्यात आले. जर देशातल्या बड्या राजकीय नेत्याचे आणि पक्षाचे ट्विटर अकाऊंट हॅक होऊ शकते तर कोणाचेही अकाऊंट सहजासहजी हॅक होऊ शकते. अनेकदा अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर गोपनीय माहिती काढून घेतो किंवा त्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह पोस्ट तरी टाकण्यात येतात यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
वाचा : ..अन् ट्विटरने स्वतःच्याच सीईओचे अकाऊंट केले निलंबित
ट्विटर सारख्या मायक्रोब्लॉगिंग साईटचा वापर करणारा एक मोठा वर्ग भारतात आहे. त्यामुळे आपले ट्विटर खाते कसे सुरक्षीत राहिल याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. ट्विटरवर तुमचे अकाऊंट जर हॅक झाले तर तुम्हाला त्यावर लॉगइन करताना आणि पासवर्ड टाकताना अडचणी येतील. त्यानंतर बरेचदा अकाऊंटवरुन आक्षेपार्ह फोटो, मजकूर किंवा लिंक्स ट्विट केल्या जातात. फोलोअर्सना देखील आक्षेपार्ह संदेश पाठवले जातात. त्यामुळे अकाऊंट हॅक झाले तर तुम्हाला त्याची कल्पना येईल. अकाऊंट हॅक झाले तर याची माहिती लगेचच ट्विटरला कळवा. यासाठी लॉगइन करताना खालीच तुम्हाला तसा पर्याय दिसेल. यासाठी ट्विटरवर ‘हेल्प सेंटर’चा पर्याय दिलेला असतो. जर अकाऊंट हॅक झाले तर ‘हॅक अकाऊंट’ पर्यायावर क्लिक करून तुम्ही ट्विटरकडून मदत मागू शकतात. यासाठी तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक आवश्यक आहेत. त्यावर दिलेल्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे अकाऊंट पूर्ववत होऊ शकते.
वाचा : ट्विटरच्या विक्रीची टिवटिव…
पण अनेकदा याचा वेगळा त्रासही होऊ शकतो. अनेक घटानांमध्ये हॅकर्सकडून युजर्सच्या फोटोंवर आक्षेपार्ह मजकूर टाकून किंवा मॉर्फकरुन त्यांनी बदनामीही केली जाते. त्यामुळे अशा प्रसंगात सायबर क्राइम विभागाला याची माहिती द्या. ट्विटर अकाऊंट हॅक होऊ नये याची काळीत तुम्हीही घेणे तितकेच गरजेच आहे. कोणत्याही लिंक्स ओपन करून नका याद्वारे तुमचे अकाऊंट हॅक होण्याची शक्यता अधिक आहे. लिंक्स उघडताना युआरएल अॅड्रेस बघून घ्या. अशा लिंक्समुळे तुमचे अकाऊंट हॅक होण्याची शक्यता अधिक असते. पासवर्ड ठेवताना देखील त्यामध्ये अक्षर आणि अंक या दोघांचाही वापर करा. पासवर्ड वेळोवेळी बदलत रहा.