scorecardresearch

Premium

जेव्हा स्वप्न पूर्ण होते! वडिल विमानात आले आणि कळले आपली लेकरंच पायलट आहेत; आनंदाने अश्रू अनावर..VIDEO व्हायरल

बाबा विमात चढतात तेव्हा प्रवेशद्वारावर त्यांची मुलं त्यांना अगदी हटके सरप्राईज देतात.

When Father came to the plane and found out his daughter and son was the pilot
(सौजन्य:इन्स्टाग्राम/@rikkigupta) वडिल विमानात आले आणि कळले आपली लेकरंच पायलट आहेत; VIDEO व्हायरल

आई-बाबाचे आपल्या जीवनातील स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आई आपल्या मुलांवर खूप प्रेम करते, तर बाबा मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. तर या गोष्टीची जाणीव अनेक मुलांना असते आणि ते आई-बाबांचे कष्ट पाहून त्यांना प्रत्येक सुख देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना भविष्यात यशस्वी होऊन दाखवतात. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बाबा विमानातून प्रवास करत असतात. यादरम्यान बाबांना कल्पना नसते की, हे विमान त्यांची दोन्ही मुलं चालवणार आहेत. तर बाबा विमानात चढतात तेव्हा प्रवेशद्वारावर त्यांची मुलं त्यांना अगदी हटके सरप्राईज देतात.

एका गुप्ता कुटुंबातील भाऊ आणि बहीण हे विमानात पायलट असतात. तर या दरम्यान त्याचे वडील प्रवास करण्यासाठी विमानात येतात. बाबा विमानात चढताना तेव्हा विमानाच्या प्रवेशद्वारावर त्यांची लेक उभी असते. विमानात आतमध्ये येताच स्वतःच्या लेकीला पाहून बाबा अगदीच आनंदी होतात. तसेच या आनंदात आणखीन भर घालण्यासाठी विमानाचे को-पायलट म्हणजेच बाबाचा मुलगा त्यांना भेटण्यासाठी येतो आणि त्यांच्या आदरपूर्वक पाया पडून त्यांना नमस्कार करतो. व्हायरल होणार हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा.

rajan vichare eknath shinde anand dighe birth anniversary shivsena thane
आनंद दिघे हेच गद्दारांना त्यांची जागा दाखवतील ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची शिंदे गटावर टीका
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
Bhaskar Jadhav on Rashmi Thackeray
“वहिनी आता बाहेर पडायची वेळ आलीय”, भास्कर जाधवांचं रश्मी ठाकरेंना भावनिक आवाहन; म्हणाले…
man commits suicide after wife sister in law asking money for liquor
पिंपरी : दारूसाठी पैसे मागणाऱ्या पत्नी, मेहुणीच्या त्रासाला कंटाळून देहूरोडमध्ये तरुणाची आत्महत्या

हेही वाचा…Video : ऑफिसला जाताना रोज फॉर्मल शूज वापरताय? मग फॅक्टरीत ते कसे बनवले जातात, एकदा पाहाच

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, बाबांना कप्लना नसते की, ते ज्या विमानातून प्रवास करणार आहेत ते विमान त्यांची दोन्ही मुले चालवणार असतात. जेव्हा वडील विमानात येतात. तेव्हा आपल्या मुलांना पायलटच्या गणवेशात पाहून वडिलांना खूप अभिमान वाटत होता ; हे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट सांगत होता. तसेच या क्षणाला आणखीन खास करण्यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी बाबांबरोबर विमानात एक फोटो सुद्धा काढला आणि युजरने सोशल मीडियावर हा क्षण व्हिडीओ बनवून शेअर केला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rikkigupta या युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच श्याम गुप्ता असे वडिलांचे तर रिक्की गुप्ता असे या लेकीचे नाव असते. ‘लक्षात राहणारा एक विमान प्रवास’ ; असे कॅप्शन तरुणीने या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर भावुक झाले आहेत तसेच या खास क्षणावर विविध प्रतिक्रिया मांडताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When father came to the plane and found out his daughter and son was the pilot asp

First published on: 27-11-2023 at 15:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×