लहानपणापासून कोडकौतुकानं वाढवलेली मुलं जेव्हा शिक्षणासाठी, नोकरीसाठी, लग्नामुळे किंवा अन्य कारणांसाठी दूर दूर परदेशी निघून जातात, त्यावेळेस त्यांच्या आई-वडिलांना एकाकीपण जाणवत. आज भारतातील अनेक कुटुंबांमध्ये अशी स्थिती दिसून येते. लहान शहरातून मोठ्या शहरात किंवा परदेशात मुलं जातात तेव्हा त्यांच्या मागे राहिलेल्या पालकांमध्ये विशेषतः घरातल्या आईच्या मनात एकाकीपण येते. घरट्यातली पिलं उडून गेली घरटं रिकामं झालं असं वाटायला लागून एका कौटुंबिक ताणाला सामोरे जावे लागते.

मात्र एका तरुणानं परदेशात स्थायिक झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना आपल्या परदेशातील घरी नेताना मुलाने जबरदस्त स्वागत केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या तरुणाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीने आई-वडिलांना विमानतळावरून चेअरवर बाहेर आणलं त्यानंतर त्यांच्या गाडीत बसवून घरी आणलं. पुढे त्यांच्या सुनेनं त्यांचं घरात येण्यपूर्वीच उंबरठ्यावर औक्षण केलं. आई-वडिल पहिल्यांदा परदेशात आले होते, त्यामुळे त्यांचं वेगळ्या पद्धतीने स्वागत करायचं अशी त्यांती इच्छा होती. त्याचप्रमाणे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आई-वडिलांच स्वागत मुलानं केलं. आपल्यासाठी उभं आयुष्य ज्यांनी कष्ट केले त्यांना चांगले दिवस दाखवण्याचं स्वप्न प्रत्येक मुलगा बघतो, यावेळी आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंदही खूप काही सांगून जातो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – दादर स्टेशनवर चोरी कशी होते? पाहा; मोबाईल चोराचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याची दुसरी बाजू म्हणजे जुन्या लोकांना कोणत्याही ठिकाणी नेलं तरी गाव मात्र सुटत नाही. अशावेळी गड्या आपलं गावचं बरं म्हणत पुन्हा गावी जातात. मात्र पुन्हा मुलांच्या आठवणीने त्यांना एकटेपण येत. परदेशात किंवा मुलांनी मोठ्या शहरात जावं म्हणून तुम्हीच तर खस्ता खाल्ल्या, तुम्हीच तर त्यांनी मोठ्या नोकऱ्या कराव्यात यासाठी प्रयत्न केले. तेव्हा तुमच्या लक्षात आले नव्हते का? आता या एकटेपणाच्या भावनेचे रडगाणे गाण्यात काय अर्थ आहे? असा प्रश्न त्यांना विचारला जातो. त्यामुळे नक्की आपले काय चुकले याचा अर्थ लावण्यात आणखीच नैराश्य दाटून येतं.