Mira Road Skywalk Drunkards Viral Video : मिरारोडमध्ये काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावरुन व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधात अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. यानंतर मराठीला विरोध करणाऱ्यांविरोधात ८ जुलै रोजी मराठी भाषिकांकडूनही मोर्चा विराट मोर्चाची हाक देण्यात आली होती, या मार्चोत मोठ्या संख्येने मराठी माणूस रस्त्यावर उतरला. दरम्यान मिरारोडमध्ये मराठी- अमराठी विरोधात मोर्चे निघत असताना सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांनी मिरारोडमध्ये या गोष्टींविरोधात कधी मोर्चे निघणार असा संतप्त सवाल केला आहे. मिरारोडमधील स्कायवॉकवर रात्रीच्यावेळी गर्दुल्ले, नशेबाज आणि बेघरांची दहशत पाहायला मिळते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना इथून चालणंही जीवघेणं वाटू लागलयं. याच धक्कादायक परिस्थितीचं चित्रण व्हायरल व्हिडीओत करण्यात आलं आहे. यावरुन अनेकांनी मिरारोडमधील स्कायवॉकवर सुरु असलेल्या या बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी पुढाकार घ्यावा अशी विनंत केली आहे.
कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन मिरारोडमध्ये मोठ-मोठे स्कायवॉक बांधण्यात आले, पण या स्कॉयवॉकवर रात्रीच्यावेळी मोठ्या संख्येने नशेबाज तरुण, गर्दुल्ले आणि भिकारी पाहायला मिळतात. व्हायरल व्हिडीओतही तुम्हाला हेच चित्र दिसेल, या व्हिडीओत पाहू शकता, एक नशेबाज तरुण स्कायवॉकच्या रेलिंगवर बसलेल्या दुसऱ्या नशेबाज तरुणाला बेदम मारहाण करतोय, तो शर्टाला पकडून त्याला अक्षरश: रेलिंगवरुन जोरात खाली खेचतो आणि मारू लागतो. यानंतर व्हि़डीओ पुढे काही गर्दुल्ले, भिकारी ठाण मांडून बसलेले आणि झोपलेले दिसतायत. दरम्यान अनेक नशेबाज लोक स्कायवॉकवर फिरताना दिसतायत. यावेळी एकही पादचारी या स्कायवॉक वरुन चालताना दिसून येत नाहियेय. त्यामुळे स्कायवॉक हे रस्ता ओलांडणाऱ्या प्रवाशांसाठी आहेत की गर्दुल्ले, जुगारी लोकांसाठी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान लोकांनी आता मिरारोडमधील स्कायवॉकवरील या घटना रोखण्यासाठी खऱ्या मोर्चाची गरज आहे असे म्हटले आहे. पण फक्त मिरारोडचं नाही तर बोरिवली, कांदिवली अशा अनेक भागातील स्कॉयवॉक तुम्हाला असेच भीषण चित्र दिसेल.
दरम्यान मिरारोडमधील स्कायवॉकचा हा धक्कादायक व्हिडीओ @mirabhayandarlife नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे जो आता तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले की, अनेक स्कायवॉक हे गुन्हेगारांचे अड्डे बनत आहेत. पण कोणत्याही सुरक्षा यंत्रणांना सर्वसामान्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायचे नाही. दुसऱ्याने लिहिले की, या घटनांविरोधात कोण मोर्चे काढणार नाही आता, या परिस्थितीमुळे तरुण नशेच्या आहारी जात आहेत. पण कोणी त्याविरोधात बोलणार नाही. तिसऱ्याने लिहिले की, या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत कारवाई झाली पाहिजे, कारण हे नशेबाज, गर्दुल्ले लोक कधी कोणावरही हल्ला करु शकतात आणि यातून मोठी घटना घडू शकते.