New Gautami Patil : गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नृत्यांगणा आहे. गावो-गावी, शहरो-शहरी ती कार्यक्रम राबवित असते. लहानांपासून वृद्ध लोकांपर्यंत तिचा चाहता वर्ग आहे. आपल्या नृत्य शैलीने ती अनेकांचे मन जिंकत असते. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी लोक आवडीने तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. गौतमी पाटीलचा मोठा चाहता वर्ग असल्यामुळे अनेक जण तिच्या डान्सची नक्कल करतात पण तुम्ही एका तरुणीला पाहिले आहे का, ती फक्त गौतमी पाटीलसारखा डान्स करत नाही तर चक्क सेम टू सेम तिच्यासारखी दिसते. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हे खरंय. सध्या या तरुणीची जोरदार चर्चा सुरू आहे.

आता गौतमी सारख्या दिसणाऱ्या एका नव्या तरुणीने या नृत्य क्षेत्रात दमदार एन्ट्री घेतली आहे.ही गौतमी पाटील सारखी दिसते आणि तिच्या सारखाच उत्तम डान्स करते. लोकांना या नव्या गौतमीचे वेड लागले आहे. या तरुणीचे नाव आहे तनुश्री पुणेकर. ही एक नृत्यांगणा आहे. तिचे डान्स व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ती स्टेजवर जेव्हा डान्स करते तेव्हा गौतमी पाटीलच डान्स करतेय, असे वाटते. तिचा चेहराच फक्त गौतमी पाटील सारखा दिसत नाही तर तिचे हावभाव, डान्स करण्याची पद्धत एवढेच काय तर पेहराव पाहून गौतमी पाटीलची आठवण येते.

हेही वाचा : Mumbai : मुंबई लोकल अन् मरणाची गर्दी! मुंबईकरांचा जीव की प्राण असलेली लोकल ट्रेन, पाहा व्हायरल व्हिडीओ

tanushri_punekar123_ या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ती तिचे डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत तनुश्री सांगते, “नमस्कार मी तनुश्री पुणेकर. सर्वांना विनंती आहे कोणीही मला गौतमी पाटील किंवा डुप्लिकेट असं काहीही बोलू नका. मी तनुश्री पुणेकर आहे तर सर्वांनी तनुश्री पुणेकरच म्हणा आणि सगळे एवढं प्रेम देत आहे त्यासाठी सर्वांचे आभारी आहे. असेच प्रेम देत राहा. धन्यवाद”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिच्या डान्स व्हिडीओवर युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव करत असतात. अनेक युजर्सनी तिला गौतमी पाटीलची डुप्लिकेट किंवा गौतमीची बहीण म्हणताहेत. अनेकांना तिचा डान्स आवडतोय. तिच्या व्हिडीओवर लोक हार्टचे इमोजी शेअर करताना दिसून येताहेत तर काही गौतमीचे चाहते तनुश्री हुबेहूब गौतमीची कॉपी करत असल्याची टिका करताहेत.