जगातील सर्वाधिक चर्चेत असणारी आणि चर्चा घडवून आणणारी वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरने सोमवारी मोठ्या खांदेपालटासंदर्भातील घोषणा केली. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजेच डॉर्सी यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांना नियुक्त करण्यात येणार आहे.
ट्विटरच्या या घोषणेनंतर पराग अग्रवाल यांच्या नावाची सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा आहे. पण अचानक चर्चेत आलेले पराग अग्रवाल नक्की आहेत तरी कोण याबद्दल अनेकांना ठाऊक नाहीय. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…

नक्की पाहा हे फोटो >> IIT मुंबई ते Twitter CEO व्हाया Microsoft… पराग अग्रवाल यांचा भन्नाट प्रवास

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

१) ट्विटरची धुरा संभाळण्यासाठी सज्ज असलेले पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत.

२) पराग अग्रवाल यांनी मुंबई आयआयटीमधून कंप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगमध्ये बॅचलर्स डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.

३) आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पराग यांनी अमेरिकेतील स्टॅण्डफोर्ड विद्यापिठामधून कंप्युटर सायन्समध्ये पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं.

४) त्यानंतर पराग यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि याहू रिसर्च येथे महत्वाच्या पदांवर काम केलं.

५) पराग २०११ पासून ट्विटर या कंपनीच्या सेवेत आहेत.

६) पराग हे ट्विटरचे पहिली इंजिनियर ठरले ज्यांनी अगदी रेव्हेन्यूपासून कस्टमर इंजिनियरिंगपर्यंतच्या सर्व विभागांमध्ये काम केलं आहे.

नक्की वाचा >> पराग अग्रवाल Twitter चे CEO होणार समजल्यानंतर एलॉन मस्क म्हणतो, “भारतीयांच्या कौशल्याचा…”

७) ट्विटरला पुन्हा लोकप्रियता मिळवून देण्यात आणि २०१६-२०१७ दरम्यान मोठ्या संख्येने युझर्सला स्वत:कडे आकर्षित करण्यात ट्विटरला जे यश मिळालं त्यात पराग यांचा मोठा वाटा आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.

८) २०१७ मध्ये पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या ‘सीटीओ’पदी नियुक्ती करण्यात आली होती. जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत.

९) सीटीओ पदी नियुक्त झाल्यापासून पराग यांच्यावर कंपनीची तांत्रिक आघाडी कशी असेल, मशिन लर्निंगचा वापर कसा करता येईल आणि सुधारणांसदर्भातील निर्णयांचे प्रमुख आहेत.

१०) २०१९ मध्ये जॅक यांनी पराग यांना प्रोजेक्ट ब्ल्यूस्कायचे प्रमुख पद दिलं. ट्विटरवरील चुकीच्या माहितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ओपन सोर्स पद्धतीने ब्ल्यूस्काय प्रकल्प सुरु करण्यात आलेला.

नक्की वाचा >> आनंद महिंद्रा म्हणतात, “जगभरात पसरलेल्या या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान, यावर कोणतीही…”

११) २९ नोव्हेबर २०२१ रोजी पराग कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील असं जाहीर करण्यात आलं.

१२) अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्वीट केले. जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

१३) जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.