Husband Wife Fighting Viral Video: सोशल मीडियावर नवरा-बायकोमधील भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही धक्कादायक असतात. अनेकदा नवरा बायकोमधील किरकोळ वाद हाणामारीपर्यंत पोहचल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित होऊ शकता. कारण व्हिडीओतील नवरा-बायको एकमेकांना अशा पद्धतीने मारहाण करत आहेत की, आता ते एकमेकांचा जीव घेतात की काय? असा प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्यांना पडला आहे.

सोशल मीडियावर अनेक पती पत्नीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी पती पत्नीच्या नात्यातील गोडवा दिसून येतो तर कधी त्यांच्या नात्यातील प्रेम दिसून येते. अनेकदा पती पत्नीचे भांडतानाचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पती पत्नी भांडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरणार नाही तर काही लोक अवाक् होतील.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पत्नीने पतीला पूर्ण ताकदीने उचलत जमिनीवर फेकल्याचेही दिसून येते, यानंतर तो पूर्णपणे बेशुद्ध होतो. नवऱ्याची अवस्था पाहून तो उठण्याच्या मनस्थितीत नाही असे वाटते. बायकोचा राग पाहून तिला पतीवर खूप राग आला होता हे स्पष्ट झाले. पती शांत राहिला आणि प्रतिसाद देत नाही, तर पत्नीचा राग वाढल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. हे दृश्य अतिशय नाट्यमय आणि थरारक वळण घेते, जे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हे कोणतं ठिकाण आहे, नवरा बायको नेमके का एकमेकांना मारत आहेत याची माहिती मिळाली नाहिये.त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तो ठरवून शूट केल्याचं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by FUNNY?MEME & COMEDY? (@dramebaazchhori99)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ dramebaazchhori99 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, “दोघेही कॉमेडी करत आहे. मला वाटतं हे नाटक आहे.” तर आणखी एका यूजरने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे, त्याने लिहिलं, “देवा अशी बायको नको रे बाबा” आणखी एक युजरने लिहिलं, “देव या जोडप्याला सुरक्षित ठेवो.”