अपघात केव्हा, कधी आणि कसा होईल सांगता येत नाही. कितीही खबरदारी घेतली तरी दुर्घटना घडणे निश्चितच असते. काहीवेळा आपल्या चुकीने, तर काहीवेळा समोरच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडत असतात. यात चुकी नसतानाही अनेकदा त्रास सहन करावा लागतो. अलीकडेच अशा एका रस्ते अपघाताचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात खासकरून महिलांना बाईकवर साडी, ड्रेस, बुरखा घालून बसताना खूप काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे; अन्यथा एका चुकीमुळे तुम्हीही अपघाताचे बळी ठरू शकता.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बुरखा घातलेली एक महिला तिच्या पती आणि मुलासह बाईकवरून जाताना दिसतेय. यावेळी मूल आईच्या कुशीत बसलेलं होतं. मात्र, अचानक चालत्या बाईकच्या टायरमध्ये महिलेचा बुरखा अडकतो, ज्याने दुचाकीचा तोल डळमळतो आणि पती-पत्नीसह मूल रस्त्याच्या मधोमध पडतात. यावेळी बुरखा बाईकच्या टायरमध्ये अडकल्याने ती महिलादेखील बुरख्यासह फरफटत जाते, ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे.

Meet Lisa Johnson woman who lost job got divorced now travels in private jet must read her Inspiring journey
नोकरी सुटली, मोडला संसार… लाखोंचं कर्ज असतानाही रचला इतिहास! पाहा कोट्यवधींची मालकीण लिसा जॉन्सनचा प्रवास
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
Son Of Farmer Placed To Job Pass Goverment Exam While Farming
VIDEO: जिथे संघर्ष तिथे विजय! वडील शेतात असताना लेकाचा रिझल्ट लागला; एकमेकांना मिठी मारुन रडू लागले बाप-लेक

हा व्हिडीओ शेअर करून इतर महिलांना जागरूक करण्यात आले आहे. कारण भारतात अनेक महिला साडी, ड्रेस, बुरखा घालून बाईकवर बसून प्रवास करतात. अनेकवेळा साडीचा पदर, ड्रेसची ओढणी किंवा बुरखा टायरमध्ये अडकतो. अशा परिस्थितीत अपघात होतात. यामुळे महिलांना बाईकवरून प्रवास करताना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण थोडासा निष्काळजीपणाही कसा मोठ्या अपघातात बदलतो, हे या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.