Wife Cheating in OYO Video: नवरा बायकोचं नातं हे प्रेमापेक्षा अधिक विश्वासाच्या आधारावर अवलंबून असतं. प्रेम सगळेच करतात पण जर त्या नात्यात विश्वास नसेल तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विवाहबाह्य संबंंधांमध्ये वाढ झाली असून लग्न झाल्यावरही लोक अफेअर करतात. त्या नात्यात असलेली पवित्रता, खरेपणा दूषित करतात. सध्या बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे लोकांचा दृष्टिकोनही बदलत चालला आहे.

नात्यात तिसरी व्यक्ती आली की दुरावा येतो. प्रत्येक नात्यात थोडी नाराजी, भांडणं ही होतंच असतात पण, त्यातही एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं. पण अशात काही लोक दुसरा पर्याय शोधतात आणि लग्न झालं असूनही अफेअर करतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एका नवऱ्याने त्याच्या बायकोला एका हॉटेलमध्ये पकडलं. त्यानंतर बायकोने काय केलं ते पाहाच…

व्हायरल व्हिडीओ (Wife Caught Cheating With Boyfriend in Oyo)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला ओयो हॉटेलमधून धूम ठोकून पळताना दिसतेय. या महिलेला नवऱ्याने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर पकडलं असून तिथून पळून जाण्यासाठी तिने थेट बाल्कनीतून उडी मारली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @tv1indialive या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ९ लाखांच्यावर व्ह्यूज आले आहेत. तसंच “ओयोमध्ये फसवणूक करताना बायकोला पकडलं, नवऱ्यापासून पळून जाण्यासाठी थेट बाल्कनीतून उडी मारली!” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया (OYO Viral Video)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आपल्या देशातील महिला आणि सर्वोच्च न्यायालय तिचे रक्षण करतील. नंतर, तो पुरूष स्वतःच चुकीचा ठरेल”, तर दुसऱ्याने “काहीही असो पण तिला पळून जाण्याचा मार्ग चांगलाच माहित आहे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “रंगेहाथ पकडली गेल्यावर महिला काहीही करू शकते.”