भारतीय लग्न म्हणजे एक मोठा सोहळा असतो. वेगवेगळ्या विधीसह लग्न सोहळा संपन्न होतो. आजकालच्या लग्नाला आजच्या दशकाचा टच दिलेला दिसतो. प्रत्येक विधीला गाणी, संगीताचा कार्यक्रम, नृत्य अशामध्ये काही ठरलेल्या गाण्यांचा तडका असतोच. असचं एका लग्नात वधूने ठरवलेलं एन्ट्रीचं गाण डीजे वाल्याने न वाजवल्यामुळे तिने प्रवेश करायलाच नकार दिला. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी एक वराने वधूला कानाखाली मारली होती कारण तिने नागिन गाण्यावर मद्यधुंदपणे डान्स करण्यास नकार दिला होता. नंतर तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. हा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
अगदी अलीकडेच, एका वधूने लग्नासाठी प्रवेश करताना पुढे चालण्यास नकार दिला. तिची एकमेव विनंती होती की डीजेने तिचे आवडते गाणे वाजवले तरच ती लग्नासाठी जाणार हे त्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लोकांनी बघितलं आहे. तर अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत.
Bride throws a mini tantrum & Refuses to enter wedding venue when song she wanted for her entry is not played pic.twitter.com/NmWZl3ZdwT
— Rosy (@rose_k01) August 24, 2021
तो व्हिडीओ बघून ती परिस्थिती अनेकांना मनोरंजक आणि प्रेमळ वाटली. तर असे काही लोक होते ज्यांना आनंद वाटला नाही. काहींनी या वधूच्या वागण्याचा निषेध केला. बर्याच लोकांनी वधूला ट्रोल केले आणि तिला म्हटले की, ‘क्षुल्लक मुद्दा’ …. दीखावा करू नये. दिखावा केल्याचा दोषही काहींनी दिला. तर काहींना चक्क आशा होती की या घटनेनंतर वर पळून जाईल. काही कमेंट्स बघा –
Ye shadi karne ja rahi he ya Audition Dene
— अजय (@Jaat52AJ) August 24, 2021
Aww it’s her big day. Probably rehearsed very long for it too. Even losing a hairclip/footwear/item of clothing on the wedding becomes a stressful thing. It’s the combo of nerves, fear, excitement & some brides get overwhelmed. Bridezilla word was not made-up without reason.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Sudha (@SudhaANarayanan) August 24, 2021
तथापि, असे काही लोक होते ज्यांनी वधूच्या बाजूने आपली मतं मांडली आणि तर्क केला की तिच्या मोठ्या दिवशी तिला तिच्या गोष्टी हव्या आहेत हे मागणे ठीक आहे.
yes because women should adjust and settle for less.
her family did not spend lakhs on her wedding so that she can stay mum and have a no say even on the music played for her.
— san (@slippedaffairs) August 25, 2021
या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते?