Viral Video of Taxi Driver and Women : ओला-उबर टॅक्सी बुक केल्यानंतर अनेक प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी चालक अत्यंत उद्धट असतात तर, कधी कधी उद्धट प्रवाशांशी चालकांना सांभाळून राहावं लागतं. बुक केलेली राईड रद्द केल्यावर ग्राहकांना जसा दंड आकारला जातो, तसंच ग्राहक उशिरा पोहोचवल्यावरही आकारला जातो. परंतु, चालक उशीरा आल्यास त्याच्याकडून दंड आकारला जात नाही. याच भांडणातून एका महिलेने चालकाशी हुज्जत घातली. इतकी हुज्जत घातली की शेवटी ती त्याच्या थुंकली अन् गाडीबाहेर पडली.
इनकॉग्निटो या एक्स खात्यावरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये संबंधित महिलेचा चेहरा दिसत नसला तरीही तिचा उद्धटपणा स्पष्ट दिसून येतोय. तिच्या आवाजाची पट्टी अत्यंत वरच्या स्तरावर असून तिने चालकाशी अत्यंत क्रूरपणे वाद घातलाय. पण तरीही चालकाने त्याचा संयम सुटू न देता तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि तिला गाडीबाहेर निघण्याची विनंती केली.
व्हिडिओतून नेमकं काय ऐकायला येतंय?
चालकाला प्रवाशापर्यंत पोहोचायला सात मिनिटांचा उशीर झाल्याने महिला प्रवाशाने त्याच्यासोबत हुज्जत घातली. तुझी पात्रता चालकाप्रमाणेच आहे, असं ती म्हणताना दिसतेय. “मी तुमची तक्रार करेन. मला उशीर होतेय. आम्ही उशीरा आलो की आमच्याकडून पैसे घेतले जातात. तुम्ही सात मिनिटे उशिरा आलात. ११ वाजताची माझी बुकिंग होती. पण तू ११.०७ वाजता आलास. मी तुझं का ऐकू.. तू कोण आहेस? तू कोण आहेस?” असं संबंधित महिला रागाच्या भरात त्या चालकाला बोलत होती.
मला तुमच्या हेडबरोबर बोलायचं आहे. मी तुझ्याविषयी तक्रार करणार आहे. मी गाडीतून उतरणार नाही. स्वतःची चूक कूबल कर. चूक स्वीकारायला शिक, खूप पुढे जातील. नाहीतर तुझी मुलेही चालकच होतील “, असं ती संतापाच्या भरात बोलत असतानाही चालक नम्रपणे तिला गाडीतून उतरण्याची विनंती करत होता. पण ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी तिने त्याला शिवीगाळ केली आणि त्याच्या दिशेने थुंकत गाडीतून बाहेर पडली.
This Cab driver was 7 mins "late".
The woman who booked the cab abused the driver, threatened him and spat on him.
The Taxi Driver never lost his cool. He stayed calm & composed. It is good that he recorded the incident. Otherwise, Samaj would have declared himself the culprit… pic.twitter.com/hVlnSEFkb1This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Incognito (@Incognito_qfs) January 14, 2025
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संबंधित महिलेवर प्रचंड टीका केलीय. या महिलेला सर्व टॅक्सीचालकांनी बॅन करावं असं काहींनी म्हटलंय. तर काहींनी म्हटलंय की तिच्यावर कामाचा अतिताण असल्याने ती असं म्हणत असेल, पण प्रत्येकाना सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचे नियम शिकून घेतले पाहिजेत. दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही.
