Extramarital affair Video:गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. शहर असो किंवा गाव याठिकाणी असे विवाहबाह्य संबंध आढळून येतं आहे. यामागील कारणं वेगवेगळी आहेत. अनेक वेळा प्रेम विवाहाला विरोध म्हणून दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात येतं. तर कधी कधी नवरा बायकोमधील नातं प्रेमापर्यंत पोहोचत नाही, शरीरसुखासाठी अनेक जण बाहेर जातात. विवाह हा विश्वास आणि प्रेम यावर आधार नातं आहे. यातील विश्वासच गेला तर त्या नात्याला अर्थ उरत नाही. अशावेळी प्रेमात फसवणूक करणाऱ्या जोडीदाराला शिक्षा करण्यासाठी काही वेळा कोण काय करेल काही सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे, यामध्ये एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला तिच्याच बहिणीसोबत पकडलम आहे. यानंतर तिने तिच्या बॉयफ्रेंडला भर पावसात घराबाहेर हकलंल आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी बालकणीमध्ये उभी आहे, बाहेर पाऊस पडत आहे आणि तिचा बॉयफ्रेंड पावसात उभा आहे. तो तिला म्हणतोय मारिया प्लीज बाहेर पाऊस पडतोय मला आत घे, प्लीज, मात्र ती त्याचं अजिबात एकत नाहीये. नंतर ती त्याचं सामानही त्याच्या अंगावर फेकते आणि इथून निघून जा असं वारंवार त्याला सांगत आहे. मात्र तो यामध्ये माझी काहीही चुकी नसल्याचं तिला सांगत आहे. तरुणीही प्रचंड रागवलेली असून त्याचं काहीही एकत नाहीये.

प्रत्यक्षात नाही तर स्वप्नात फसवलं…

त्यावर त्याची गर्लफ्रेंड म्हणते, नाही तू माझी मोठी फसवणूक केली आहे. या आरोपाला उत्तर देताना तो म्हणतो, अग मी तुला स्वप्नात फसवलं ना, त्यावर ती म्हणते हो तेही माझ्या बहिणीसोबत….तो तरुण तिला ओरडून विचारतो अग मग यात माझी चूक नाही ना..

आता हे वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल, या तरुणीने प्रत्यक्षात नाही तर स्वप्नात हे सगळं पाहिलं आणि तिने तिच्या बॉयफ्रेंडला बाहेर काढलं. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही तरुणीवर टीका करत आहे. तर अनेकजण गमतीशीर प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: “आमच्या आत्यानी चांद्रयानाला चाकं बसवलेत, आमचे नाना तर लटकून चंद्रावर गेले” गावच्या पोरांच्या गप्पा ऐकून पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रेकअपच्या बऱ्याच स्टोरी तुम्हाला माहिती असेल. पण सध्या सोशल मीडियावर अशी ब्रेकअप स्टोरी चर्चेत आली आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. एका तरुणीला तिचा बॉयफ्रेंड चीटिंग करत असल्याचं सतत वाटत होतं. त्यावरून तिला एकेरात्री स्वप्नंही पडलं. त्यानंतर मात्र तिने त्याच्यासोबत थेट ब्रेकअपच केला.