‘आमची मुंबई लोकल’ असा अभिमान उराशी बाळगून हजारो प्रवासी मुंबईच्या दिशेनं दररोज वाटचाल करतात. रोजची नकोशी झालेली ट्रॅफिक मुंबईकरांच्या कपाळावर आठ्या आणल्या शिवाय राहत नाही. त्यातच मुंबईच्या लोकलची गर्दी भल्या भल्यांच्या नाकी नऊ आणते. पाठीवर बॅग अन् बॅगेत टिफीन बॉक्स घेऊन कार्यालयात जाण्यासाठी निघालेला प्रवासी लोकलमध्ये ‘फोर्थ सीट’ मिळवण्यासाठीही धडपड करत असतो. पण लोकलमध्ये गर्दी नसताना एक महिला संसारात व्यग्र झालेली एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.
प्रंपचातील कामे करायला महिलांना नेहमी आवडतं. ट्रेनमध्ये मिळालेल्या फावळ्या वेळात एका महिलेनं चक्क मेथीच निवडायला घेतली. कार्यालयात जाण्यासाठी ट्रेन वेळेवर पकडण्याची घाई सर्वांनाच झालेली असते. पण या महिलेला कार्यालयात पोहोचण्याची घाई झाली नसावी, कारण संसारासाठीच नोकरीची जडणघडण सुरु असते, मग त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टींची काळजी तर घेतलीच पाहिजे, असा मेसेजच या व्हिडीओच्या माध्यमातून दिला जात आहे.
इथे पाहा व्हिडीओ
मेथी खाल्ल्याने आरोग्यासाठी खूप फायदे होतात. सांधेदुखी तसेच वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. तसचे ज्या पुरुषांना लैंगिक समस्या आहे, त्यांना मेथीच्या सेवनाचा फायदा होतो. मेथीच्या दाण्यांमध्ये सेपोनिन असते. याचा फायदा पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हार्मोन्समध्ये उत्तेजना निर्माण करण्यासाठी होऊ शकतो. तसेच मेथी खाल्ल्याने शरीरावरील सूज कमी होते. मेथीच्या दाणांमध्ये उष्णता असते, त्यामुळे मेथीचं अतिसेवन केल्यास त्वेचेच्या समस्या निर्माण होई शकतात, त्यामुळं मेथीचं सेवन प्रमाणात असावं.