Women content creator returns to India after 5 years: परदेशात स्थायिक होण्याची स्वप्ने अनेक तरूण-तरूणींची असतात. ज्यांना परदेशात शिक्षण किंवा नोकरीची संधी मिळते, त्या प्रत्येकाचे अनुभवही वेगवेगळे असतात. भविष्यातील कितीतरी वर्षे देत उराशी स्वप्नं बाळगून अनेक जण परदेशात स्थायिक होतात. यामागे नेमकं कारण काय याचा विचार केला तर चांगली जीवनशैली, चांगला पैसा, स्वातंत्र्य अशी बरीच कारणं समोर येतात. असाच अनुभव लंडनहून ५ वर्षांनी परतलेल्या कंटेंट क्रिएटर जिगीशा गुप्ता हिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
“लंडनमध्ये ५ वर्षे राहिल्यानंतर मी घरी परतले. पाच वर्षे, १८२५ दिवस. मी १९व्या वर्षी भारत सोडला, ज्यावेळी मला मी कोण आहे हे कळतही नव्हते. माझ्या सुटकेसपेक्षा मोठी स्वप्ने माझ्यासोबत होती. लंडनने माझे फक्त स्वागत केले नाही, तर मला वाढवले”, असा अनुभव जिगीशा हिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
जिगीशाने परदेशात राहताना समोर आलेल्या चढ-उतारांबाबत उघडपणे सांगितले. सुरूवातीला पहिल्या हिवाळ्यातील रात्री अनेक अडचणींवर मात करून विजय मिळवला. मी युट्यूबवर रडले, छोट्या घरात राहिले, अशा नोकऱ्या केल्या ज्यांनी मला खूप काही शिकवलं. प्रत्येक वेळी मला घराची आठवण आली आहे आणि त्याचवेळी तिथे मला माझं घर सापडलं.
लंडनमध्ये राहताना तिला कधीच जाणवलं नाही असा आत्मविश्वास, नवी दृष्टिकोन, मित्रपरिवार आणि नवीन ओळख दिली. निर्भयपणे स्वप्ने पाहू शकणारी, खोलवर प्रेम करू शकणारी आणि कोणत्याही वादळात तग धरून उभी राहणारी अशी माझी मला मी सापडली, तिथे मी नव्याने जन्म घेतला अशा भावना जिगीशाने व्यक्त केल्या.
त्यानंतर मात्र जिगीशाने भारतात परतण्याचा अनुभवही शेअर केला. “हा एक गुंतागुंतीचा, भावनिक अनुभवहोता. आता मी भारतीय भूमीवर परत येताच, मी ती व्यक्ती नाही जी इथून गेली होती. मी जगाचे दोन चेहरे पाहिले, दोन संस्कृती, दोन घरं सोबत आहेत.” परतल्यानंतर भावनिक पातळीवर स्थिरस्थावर होण्यासाठी साधारण एक महिना लागला. हा लंडनला निरोप नाही, तर पुढच्या इनिंगसाठी नमस्कार आहे असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.
जिगीशाने शेअर केलेल्या अनुभवानंतर अनेक जणांनी तिला कमेंट करत त्यांचेही अनुभव असेच असल्याचे सांगितले. एका युजरने म्हटले की, “स्वातंत्र्य, स्वच्छता आणि जास्त पगार वगळता भारतात सर्व काही आहे. मला वाटते भारताकडे यूकेमध्ये आपण जे काही गमावले ते सर्व आहे.”
