Woman dances While Skateboarding Video Viral : सोशल मीडियावर स्टंटबाजी करणाऱ्या लोकांचे जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण एका महिलेच्या व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण स्केट बोर्डिंग करणं अनेकांना अवघड वाटतं पण या महिलेनं स्केट बोर्डिंग करून भन्नाट डान्स केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका मोकळ्या रस्त्यावर महिलेनं स्केट बोर्डिंगचे स्टंट करून जबरदस्त नृत्यही करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेचा हा जबरदस्त व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या महिलेनं केलेलं अप्रतिम नृत्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

महिलेचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यापासून नेटकरी जबरदस्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, स्केट बोर्डिंग करताना त्या महिलेचं फूटवर्क संमोहित करणारं आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, हा संपूर्ण व्हिडीओ खूप सुंदर आहे. तर अन्य एक नेटकरी म्हणाला, मला स्केटबोर्डिंग करणं जमतं, पण ते करत असताना अशाप्रकारचा डान्स करणं अवघड वाटतं.

नक्की वाचा – ‘या’ महिलेचं LinkedIn प्रोफाईल का होतय व्हायरल? पोस्ट पाहून यूजर्स म्हणाले, “प्रामाणिकपणाचं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
simply “Riding It” would be an understatement
byu/ViktorSwimwell innextfuckinglevel

ती स्केटबोर्डिंगवर डान्स करत आहे, अशाप्रकारचं नृत्यू मी याआधी कधी पाहिलं नाही, अंसही एका नेटकऱ्याने म्हटलं. तसंच एकाने महिलेचं कौतुक करत म्हटलं की, अशा प्रकारची स्केटबोर्डिंग मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. वॅलेरिया गोगन्सकाया असं या स्केटबोर्डिंग करणाऱ्या महिलेचं नाव असून मोकळ्या रस्त्यावर स्केटबोर्डिंग करताना तिने केलेल्या डान्सचं सर्वत्र कौतुक होत आहे. महिलेच्या स्केटबोर्डिंगच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.