दिल्लीतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील डोश्यात ग्राहकाला एक दोन नव्हे तर तब्बल आठ झुरळ सापडल्याचा किसळवाणा प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस (CP)मधील दाक्षिणात्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या मद्रास कॉफी हाऊस रेस्टॉरंटमधील हा धक्कादायक प्रकार आहे. याप्रकरणी ईशानी नावाच्या एक तरुणीने हा भयावह अनुभव असल्याचे म्हणत घडलेल्या घटनेविषयी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत माहिती दिली आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात ईशानी तिच्या मित्रासह दक्षिण भारतीय पदार्थ्यांचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून दिल्लीच्या मद्रास कॉफी हाऊस रेस्टॉरंटमध्ये गेली होती. यावेळी ईशानीने तिच्यासाठी एक मसाला पेपर डोसा ऑर्डर केला. पण खाताना जेव्हा तिने हा डोसा उघडून पाहिला तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. तिने डोश्याचे बारकाईने निरीक्षण तेव्हा त्यात एक दोन नव्हे तर चक्क ८ झुरळ होते. या किसळवाण्या प्रकारानंतर तिने या कॅफेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Liquor license, lok sabha election 2024, wife of sandipan Bhumre, mahayuti, chhatrapati sambhaji nagar
भूमरेंच्या पत्नीच्या नावेही मद्य परवाना
Thane, ST, bogus certificate,
ठाणे : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एसटी महामंडळात नोकरी
delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

ईशानीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये संबंधीत रेस्टॉरंटच्या किचनमधील अस्वच्छ परिस्थितीचे तपशीलवार वर्णन केले आहे, ईशानीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले की, जे काही घडले ते आठवून माझे काळीज तुटतेय. या कॅफेमध्ये अतिशय दुर्गंधी आणि छत काहीप्रमाणात नव्हतेच.

गुरुवारी व्यस्त असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये दर तासाला ३० ग्राहक येत असतात, तरी पण हे प्रतिष्ठित रेस्टॉरंट इतके निष्काळजी कसे असू शकते हेच मला समजत नाही, असे म्हणत ईशानीने तिच्या पोस्टमध्ये अन्न सुरक्षेच्या अधिकारावर जोर दिला.

तिने पुढे लिहिले की, हे एक शाकाहारी रेस्टॉरंट आहे, ज्याचे मालक शाकाहारी आहेत, या घटनेनंतर ते मला सतत सांगत होते की, तुला नुकसान भरपाई दिली जाईल, पण व्हिडिओ बनवणे थांबव.

ईशानीने असेही नमूद केले आहे की, तिने याप्रकरणी सीपीमधील स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

तसेच ईशानीने अन्न, स्वच्छता आणि सुरक्षेसंबंधित अधिकाऱ्यांना या घटनेची सर्व तपशीलवार माहिती दिली आहे. पण तिने पुरावा म्हणून ही पोस्ट केली. तिने म्हटले की, ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कारण अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर निराश आहे. पण कारवाई होईपर्यंत मी गप्प बसणार नाही.

ईशानीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांनी संबंधीत रेस्टॉरंटवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी अन्न स्वच्छता आणि सुरक्षा मानकांशी तडजोड केल्याबद्दल रेस्टॉरंटवर कारवाईची मागणी केली.