राजस्थानमधील टोंक येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयात रविवारी एका महिलेने तब्बल चार मुलांना जन्म दिला आहे. आईसह ही सर्व मुले पूर्णपणे निरोगी आहेत, अशी माहिती समोर आली आहे. पण, महिलेच्या प्रसूतीनंतर डॉक्टरही हैराण झाले आहेत.
संबंधित महिलेला लग्नाच्या चार वर्षांनंतरही मूल होत नव्हते; पण तब्बल चार वर्षांनंतर तिने आता एक नव्हे, तर तब्बल चार मुलांना जन्म दिला आहे. एकत्र चार अपत्यांचा जन्म झाल्याने तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. संबंधित महिलेने दोन मुले आणि दोन मुलींना जन्म दिला आहे.
टोंकच्या वजीरपुरा गावातून ही घटना समोर आली आहे. रविवारी या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले; जिथे सोमवारी सकाळी तिने प्रथम मुलाला जन्म दिला आणि काही मिनिटांनंतर आणखी तीन मुलांना जन्म दिला. त्या चारपैकी दोन मुले व दोन मुली असून, ती मुले पूर्णपणे निरोगी आहेत. सर्व मुले आणि आई सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
दोन-तीन मुलांच्या जन्माच्या अनेक बातम्या समोर येत असल्या तरी चार अपत्ये झाल्याच्या बातम्या क्वचितच ऐकायला मिळतात. त्यातही जन्मानंतर एक किंवा दोन मुलांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. यापूर्वी टोंक जिल्ह्यात अशी आणखी दोन प्रकरणे नोंदवली गेली होती, जेव्हा महिलेने चार मुलांना जन्म दिला होता. परंतु, एका घटनेत एक आणि दोन मुलांचा मृत्यू झाला होता.
मात्र, आता ही चारही मुले आणि आई निरोगी आहेत. एकत्र चार अपत्यांचा जन्म झाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. डॉक्टरांच्या मते, १० लाख केसेसमध्ये अशी एक केस येते; ज्यामध्ये अनेक मुले एकत्र जन्माला येतात.