Woman Skating in Saree: स्केटबोर्डिंग हा असा खेळ आहे जो सहसा कोणाला जमत नाही. फार कमी लोकांना स्केटिंग करता येतं. हा खेळ बघायला जितका धोकादायक वाटतो तितकाच तो मजेदारदेखील आहे. स्केटिंग करताना समतोल राखण्यासाठी चांगला सराव खूप महत्त्वाचा असतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जी हेल्मेट आणि सेफ्टी गियर ऐवजी साडी परिधान करून स्केटबोर्ड चालवत आहे.
व्हिडीओतील मुलीचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. साडी नेसून ती स्केटबोर्डवर फिरायला निघाली आहे. तिने आपल्या हातांनी नमस्तेची मुद्रा केली आहे आणि ती अप्रतिम स्केटिंग करताना दिसत आहे.
(हे ही वाचा: Kshama Bindu Sologamy: अखेर नवरदेवाशिवाय पार पडलं लग्न! सप्तपदी घेत बांधली स्वतःशीच)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मुलीने केरळची पारंपारिक पांढऱ्या आणि सोनेरी बॉर्डरची साडी नेसली आहे आणि केसांमध्ये गजराही घातला आहे. पायात शूज घालून स्केटबोर्डवर ती आरामात राईड करत आहे. यावेळी ती खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहे. केरळच्या सुंदर हिरव्या मार्गावर स्केटिंग करणारी ही ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर लॅरिसा अशी आहे. लॅरिसा ही मुंबईची रहिवासी असून तिला फिरायला आवडतं.
(हे ही वाचा: Viral Video: ‘या’ व्यक्तीने हातात एकत्र पकडले असंख्य जिवंत साप; व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांचा विश्वास बसेना!)
(हे ही वाचा: पॅराग्लायडिंग करत असताना अचानक समोर आला पक्षी अन्…; बघा Viral Video)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
साडीत स्केटबोर्डिंग करणं सोपं नसल्याची कबुली लॅरिसाने दिली आहे. हा व्हिडीओ १ दशलक्षाहून अधिक म्हणजेच १० लाख लोकांनी पाहिला आहे आणि १ लाख ७५ हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. पोस्टवर कमेंट करताना हजारो लोकांनी लॅरिसाच्या टॅलेंटचे कौतुक केले आहे.