भारतात सरकारी नोकरीची इतकी क्रेझ आहे की, बहुतांश मुलं सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करत असतात. शिवाय एकदा का सरकारी नोकरी मिळाली की ती सोडण्याचा विचारही कोणी करत नाही. भारतच नव्हे तर अमेरिकेतही सरकारी नोकरीबाबत हीच परिस्थिती आहे. सरकारी नोकरीची सोय आणि पगार एवढा असतो की लोक ती सोडण्याचा विचारही करत नाहीत. पण सध्या सोशल मीडियावर अशा एका अमेरिकेतील मुलीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे, कारण तिने सरकारी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. ज्यामुळे ती कोट्यधीश बनली आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या ब्रायना डायमंडने कमी वेळात जास्त पैसे कमवण्यासाठी सरकारी नोकरी सोडली.
सरकारी नोकरी सोडल्यानंतर ब्रायना आता तिचे फोटो ऑनलाइन विकून पैसे मिळवते. ती तिचे प्रौढ फोटो काही वेबसाइटवर पोस्ट करते, ज्याच्या बदल्यात तिला खूप पैसे मिळतात. डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत ब्रायनाने सांगितले की, सरकारी नोकरी सोडून एवढं मोठं पाऊल उचलणं कठीण होतं, पण मला मुलाच्या भविष्यासाठी पैसे कमवायचे होते. शिवाय मला सरकारी नोकरी सोडल्याचा कसलाही पश्चाताप होत नाही.
सेवानिवृत्ती बचत केली चौपट
ब्रायना म्हणाली, “करिअर बदलून मी माझ्या सेवानिवृत्तीच्या बचतीत चौपट वाढ केली आहे आणि माझ्याकडे माझा स्वतःचा आरोग्य विमा आहे. ” तिने पुढे सांगितलं की, मी माझे फोटो जगभरातील ३३ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करते, ज्यामध्ये, प्लेबॉय सेंटरफोल्ड वेबसाइट, मनीविड्स आणि फॅन्सली यांचा सहभाग आहे. ती यामधून मिळणारे पैशांची स्वत:साठी आणि तिच्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत आहे.
कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा
ब्रायनाने सांगितलं, “मी माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी भविष्यासाठी तयारी करत आहे, सुदैवाने माझ्या कुटुंबाने माझ्या करिअरच्या वाटचालीला खूप पाठिंबा दिला आहे.” तसेच माझ्या कामामुळे माझ्या किंवा तिच्या कुटुंबाच्या नावावर परिणाम होईल असे काहीही करत नसल्याचंही ब्रायना म्हणाली
