Woman Shocking Video हल्ली लोकांना प्रसिद्ध होण्याची फार हौस असते, त्यामुळे सोशल मीडियावर इतरांपेक्षा काय वेगळं देता येईल यासाठी प्रयत्न करतात. या प्रयत्नात अनेकदा ते स्वत:च्या जीवाशी खेळतात. सध्या एका महिलेचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यात ती महिला व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी साडीला आग लावून जबरदस्त ठुमके लगावताना दिसतेय. व्हिडीओ पाहून अनेकजण चांगलेच चकित झालेत.
अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. या व्हिडीओंची लोकांमध्येही प्रचंड क्रेझ दिसून येते. अनेकदा या डान्स व्हिडीओत लोक जीवघेणे प्रकार करताना दिसतात. या व्हिडीओतही एका महिला रील व्हिडीओ हिट करण्यासाठी स्वतःच्या साडीला आग लावते त्यानंतर नाचतेय.
व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक महिला तिच्या साडीच्या पदराला आग लावून नाचताना दिसतेय. जळत्या पदरासह ती कशा डान्स स्टेप्स करतेय हे तिचं तिलाच माहिती. यावेळी तिच्या साडीने पेट घेतला असता तर मोठा अनर्थ घडला असता, पण सुदैवाने असे काही घडले नाही, हे दृश्य खरंच फार धोकादायक आहे. व्हिडिओमध्ये जवळ उपस्थित असलेली एक व्यक्ती संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद करत आहे, असे धोकादायक स्टंट केवळ स्वतःसाठीच नाही तर आजूबाजूच्या लोकांसाठी देखील धोकादायक ठरु शकतात.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @more_fun_007 नावाच्या अकाउंटने शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत, एका युजरने लिहिले की, असे कोण करते. तर दुसऱ्याने लिहिले की, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी असे कोण करतं भाऊ. तिसऱ्याने लिहिले की, आजकाल रीलबाज आपला संयम गमावत आहेत!