Snakes In Bedroom Trending video: गेल्या काही दिवसांपासून सापांचे थरकाप उडणवणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण सापांच्या एका व्हिडीओनं सर्वत्र खळबळ माजवली आहे. एरव्ही सापांना पडकून रील किंवा व्हिडीओ बनवताना अनेक जण दिसतात. तसेच सापांसोबत खेळ करण्याचा प्रयत्नही करतात. पण एका महिलेनं हद्दच पार केलीय. एक महिला बेडरूममध्ये तीन नागांना झोपवत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अशा प्रकाराचा सापांचा व्हिडीओ तुम्ही क्वचितच याआधी पाहिला असेल. सापांसोबत जीवघेणा स्टंट करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महिलेचा सापांसोबतचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले अवाक, पाहा व्हिडीओ

रेखा रानी नावाच्या युजरने सापांचा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एक महिला बेडरुममध्ये सापांसोबत खेळत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला तीन सापांना बेडरुममध्ये झोपवताना व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ती महिला सापांसोबत कधी बाहेर खेळते, तर कधी त्यांना गळ्यात घेते. एव्हढच नाही तर त्यांना चक्क बेडरुमध्ये घेऊन जात असल्याची धक्कादायक दृष्य या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहेत.

नक्की वाचा – Viral Video : वाघाच्या गुहेत शिरल्यावर असच होणार! जंगल सफारी करताना तीन वाघांनी हल्ला केला अन् घडलं…

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलेला सापांसोबत खेळ करणे साधी गोष्ट वाटत असेल, पण हे भयानक दृष्य पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला असेल. सापांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर याच हॅंडलवरून शेअर करण्यात आला आहे. याशिवाय दुसरे व्हिडीओही या महिलेनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या व्हिडीओमध्येही ही महिला सापांसोबत खेळताना दिसत आहे. गळ्यात साप टाकून ही महिला फिरत असल्याचं व्हिडीओही या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हायरल झाला आहे. महिलेचा सापांसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, “मला तर वाटतंय, ही पण नागिन असेल.”