अमेरिकेतील एका महिलेला नुकसानभरपाई म्हणून ५.२ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४० कोटी रुपये मिळणार आहेत. जीईआयसीओ नावाच्या विमा कंपनीकडून या महिलेला ही रक्कम दिली जाणार आहे. प्रियकराच्या कारमध्ये शरीरसंबंध ठेवताना लैंगिक आजाराचा संसर्ग झाल्याने या महिलेने कारचा विमा ज्या कंपनीकडून उतरवलेला तिच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आणि हा खटला जिंकला.

नक्की वाचा >> बापरे! ‘या’ देशात ६० हजार रुपयांना मिळतं कंडोमचं एक पाकीट, कारण…

मसुरी राज्यामधील ही घटना आहे. मागील मंगळवारी म्हणजेच ७ जून २०२२ रोजी मसुरी न्यायलयाने या महिलेच्या बाजूने निकाल दिल्याचं वृत्त सीबीएस न्यूजने दिलं आहे. या महिलेचा उल्लेख न्यायलयामधील कागदपत्रांवर एम. ओ. असा करण्यात आलाय. महिलेची ओळख लपवण्याच्या उद्देशाने तिची अद्याक्षरे वापरण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मात्र या प्रकरणामध्ये जीईआयसीओने वरिष्ठ न्यायायलयामध्ये दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलंय. आपल्या विमा पॉसिलीअंतर्गत हा सर्व प्रकार बसत नाही असा दावा कंपनीने न्यायालयामध्येही केला होता. जो कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावत महिलेला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिलेत.

फेब्रुवारी २०२१ मध्ये एम. ओ. ने जीईआयसीओ कंपनीविरोधात पहिल्यांदा याचिका दाखल केली. आपल्या त्यावेळेच्या प्रियकरासोबत गाडीमध्ये शरीरसंबंध ठेवताना आपल्याला एचपीव्ही म्हणजेच पॅपिलोमाव्हायरसचा संसर्ग झाला असा दावा या महिलेने याचिकेत केला. पॅपिलोमाव्हायरस हा स्पर्शाच्या माध्यमातून संसर्ग होणारा त्वचेचा आजार आहे. पुढे याच पॅपिलोमाव्हायरसमुळे आपल्याला लैंगिक आजार झाला. आपल्या प्रियकराला त्वचेची काही समस्या आहे याची आपल्याला कल्पना नव्हती असंही तिने म्हटलंय. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान या दोघांनी गाडीमध्ये शरीरसंबंध ठेवले होते त्याचवेळेस या महिलेला पॅपिलोमाव्हायरसचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. गाडीमध्ये शरीरसंबंध ठेवले त्यावेळेस ‘थेट किंवा त्या प्रकरणानंतर संसर्ग होण्यास मदत झाली’ असं या महिलेच्या पॅपिलोमाव्हायरस संसर्गासंदर्भातील अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं.

नक्की वाचा >> लग्नानंतर मित्राच्या सल्ल्याने एवढ्या व्हायग्राच्या गोळ्या खाल्ल्या की…; उत्तर प्रदेशमधील विचित्र घटना

या प्रकरणात महिलेच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये त्याने लैंगिक आजारासंदर्भातील माहिती प्रेयसीपासून म्हणजेच अर्जदार महिलेपासून लपवून ठेवल्याचं समोर आलं. त्यामुळेच आता या महिलेला ज्या गाडीमध्ये शरीरसंबंध ठेवताना संसर्ग झाला त्या गाडीचा विमा ज्या कंपनीने काढलाय त्यांच्याकडून नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयामधील निकालाविरोधाक जीईआयसीओ कंपनीने मसुरी न्यायालयामध्ये अर्ज केलेला. मात्र तिथेही कंपनीचा अर्ज फेटाळून लावत महिलेला नुकसानभरपाई देण्याचे आदेश कंपनीला देण्यात आलेत. आता या कंपनीकडून वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“निकाल देण्यापूर्वी कंपनीला स्वत:च्या हितसंबंधांबद्दल युक्तीवाद करण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता,” असा दावाही कंपनीने केलं. मात्र न्यायलायने निर्णय देताना असं म्हटलं की न्याय प्रक्रियेमध्ये कंपनीला सहभागी होण्याची आणि तिच्या हिताचे रक्षण करण्याची संधी देण्यात आली. या महिलेने विमा पॉलिसीच्या आधारे कारमध्ये घडलेल्या प्रकरादरम्यान तिला झालेला संसर्ग आणि आजार विम्याअंतर्गत येतो असं सांगत कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा केला. “कंपनीने या महिलेचं ऐकून घेतलं नाही. त्याऐवजी त्यांनी तिला विम्याअंतर्गत नुकसानभरपाई नाकारली,” असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं.